Group insurance : गट विमा योजना 1982 दि.26/04/1982 च्या शासन निर्णयानुसार 01/05/1982 पासून लागू करण्यात आली आहे. चा फायदा कर्मचारी यांचा आकस्मीक मृत्यु झाला तर त्यांच्या कुटूंबास काही मदत होते.या संदर्भात मोठी अपडेट्स समोर आली आहे.
Group Insurance new update
राज्य सरकारी कर्मचारी गट विमा योजना 1982 अंतर्गत 1 जानेवारी 2022 दिनांक 31 डिसेंबर 2022 या वर्षात संपुष्टात येणाऱ्या कर्मचाऱ्यांना देय बचत निधीचे लाभ प्रदान करण्यासाठी परिणितीय तक्ता शासन निर्णयान्वये निर्गमित करण्यात आला होता.
आता राज्य सरकारी कर्मचारी “गट विमा योजना “1 जानेवारी 2023 ते 31 डिसेंबर 2023 या काळात सदस्या संपुष्टात आल्यास देण्यात येणाऱ्या बचत निधीचे लाभ प्रदान करण्यासाठीचा परिगणितीय तक्ता सरकारकडून शासन निर्णयानुसार निर्गमित करण्यात आला आहे.गट विमा योजना अंतर्गत बचत निधीची जमा रक्कम प्रदान करण्यात येणार आहे.
गट विमा योजना महाराष्ट्र
मंत्रालयातील सर्व विभाग तसेच मंत्रालयीन विभागांच्या प्रशासकीय नियंत्रणाखालील विभाग प्रमुख कार्यालय प्रमुखांच्या मदतीने दिनांक 1 जानेवारी 2023 पासून राजीनामा, सेवानिवृत्ती,मृत्यू पावल्याने इतर काही कारणाने गट विमा योजनेचे सभासदत्व संपुष्टात येणाऱ्या कर्मचाऱ्यांना किंवा कर्मचाऱ्याच्या वारसांना सोबतच्या तक्त्यानुसार देय होणारी बचत निधीची रक्कम प्रदान करण्यात येणार आहे.
Employees Group Insurance
राज्य कर्मचारी “गटविमा योजना 1982” नुसार निधीमधील दि. 01 जानेवारी 2023 पासून राज्य शासकीय कर्मचारी गट विमा योजना 1982 लागू आहे.विमा निधीमधील जमा रकमांवर दर साल दर शेकडा 4% दरात मिळणाऱ्या व्याजदरात कोणताही बदल झालेला नाही. 4% दराने विमा निधीमधील जमा रक्कमेवर व्याजाची आकारणी करण्यात येणार आहे.