Close Visit Mhshetkari

Cluster Head : केंद्रप्रमुखांची रिक्त पदेलवकरच भरणार,पहा पात्रता,निकष परिक्षेचे स्वरूप व अभ्यासक्रम

Cluster Head  : मा.मंत्री (शालेय शिक्षण) यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 07/09/2022 रोजी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे येथे पार पडलेल्या बैठकात मा.मंत्री महोदयांनी केंद्र प्रमुखांची दिक्त पदे विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा व पदोन्नती द्वारे 50 : 50 भरण्याचे प्रमाण निश्चित करण्याचे निर्देश दिलेले आहेत.

Cluster Head Exam

शालेय शिक्षण विभागाच्या गुणवत्ता वाढीसाठी क्षेत्रीय स्तरावरील शिक्षण विस्तार अधिकारी व केंद्रप्रमुख पदे महत्वाची असतात,मात्र सदरची पदे मोठ्या प्रमाणात रिक्त असल्याने सदर पदे भरण्याबाबत शिक्षण विभागाकडे वारंवार विचारणा लोकप्रतिनिधी मार्फत होत असल्याने सदरची रिक्त पदे तात्काळ भरण्याबाबत कालबद्ध कार्यक्रम जाहीर करण्याचे पत्र ग्रामविकास विभागाने सर्व विभागीय आयुक्त यांना पाठवले आहे.”

केंद्र प्रमुख भरती 2022

सदरील कार्यवाहीस काही कालावधी लागेल तो पर्यंत केंद्रप्रमुख भरती बाबतचे यापूर्वीचे सर्व शासन निर्णय व दिनांक 10 जुन 2014 ची अधिसूचना विचारात घेऊन केंद्रप्रमुखांचा बिंदूनामावलीनुसार 40 % सरळसेवा 30 % विभागीय मर्यादित केंद्र प्रमुख भरती परीक्षेच्या रिक्त पदांचा तपशिल त्वरित उपलब्ध करुन द्यावा लागणार आहे.

हे पण पहा --  केंद्रप्रमुख विस्तार अधिकारी भरती : Cluster Head Exam Maharashtra

केंद्रप्रमुखांच्या रिक्त पदांचा तपशिल उपलब्ध करून दिल्यानंतर सर्व माहिती एकत्रित करून आयुक्त महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद,पुणे याना सादर करणे संचालनालयास सुलभ होणार आहे.

Leave a Comment