Cotton Seed Rate : राज्यातील विविध जिल्ह्यात बी. टी. बियाणांची विक्री सूरू आहे.जळगाव जिल्ह्यासाठी साडेपाच लाख BT बियाणे पाकिटे उपलब्ध करण्यात आली आहेत.यंदा कपाशीचा पेरा 20% वाढणार असून, साडेपाच लाख हेक्टरपेक्षा अधिक हेक्टरवर कपाशीचा पेरा होणार असल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली आहे.
Cotton seed rate |
कापूस बियाणे किंमत
यंदा राज्यात कापसाचे उत्पादन वाढण्याची शक्यता आहे.राज्यात कापसाच्या उत्पादन वाढीसाठी राज्य सरकार गावपातळीवर खानदेश,विदर्भ,मराठवाडा या भागातील शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी कार्यक्रम राबवत आहे.
खानदेशात सध्या कापसांच्या वाणांबाबत काळाबाजार सुरु असल्याचे दिसून येत आहे.’कापूस बियाणे 2022′ दरम्यान कृषी विभागाकडून भरारी पथकांच्या तुकड्या कारवाईही करत आहेत,परंतु काही कृषी सेवा केंद्रांमधून शेतकऱ्यांना फसवण्याचे काम सुरु आहे.
‘HTBT’ वाणांची विक्री राज्यात बंद असली तरी गुजरात,मध्य प्रदेशातून या वाणांची पुरवठा झाला आहे. दरम्यान या वाणांची खरेदी काही एजंट करीत आहेत.and त्याची विक्री जळगाव जिल्ह्यातील अमळनेर, पारोळा, धरणगाव, भडगाव, जामनेर, रावेर, एरंडोल, धुळ्यातील शिरपूर,नंदुरबारमधील शहादा, तळोदा या भागांत अव्वाच्या सव्वा दरात सुरू आहे.
हा काळाबाजार रोखण्यात प्रशासन अपयशी ठरले आहे. यंदा ‘htbt’ किंवा ‘bollgard 5’ या वाणांच्या नावाखाली बियाण्यांची खानदेशात काळ्या बाजारात एप्रिलपासून विक्री सुरू होती. ही विक्री सुरू असतानाच सरळ वाणांचाही काळाबाजार सुरू झाला आहे.
Cotton Seed Rate
Cotton production
जिल्ह्यात कपाशीचे क्षेत्र सर्वाधिक असले तरी यावर्षी मका पीकाचे क्षेत्र कमी होऊन सोयाबीन, तृणधान्य व गळीतधान्याचे क्षेत्र वाढणार आहे.जिल्ह्यात २७ लाख ५० हजार पाकिटे कपाशी बियाण्यांचे नियोजन आहे. जिल्ह्यात १ लाख ३३ हजार ४८२ मेट्रीक टन खतांचा साठा उपलब्ध आहेत. शेतकऱ्यांनी १०० मिलिमीटर पाऊस झाल्यानंतरच पेरण्या कराव्यात.” – संभाजी ठाकूर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी.
खानदेशात रावेर, शहादा,तळोदा भागांतील केळी उत्पादक बेवडसाठी सरळ वाणांची लागवड करतात. तर पारोळा अमळनेर, जामनेर, धरणगाव, शिरपूर व इतर असल्याची ‘भागांतील टंचाईचा सामना करणारे शेतकरी कुजबूजदेखील सरळ वाण लागवडीला पसंती देतात.
कमी पाणी आणि फवारणी,खतांच्या अल्प खर्चात सरळ वाणांद्वारे चांगले उत्पादन खानदेशात अनेक शेतकरी घेतात. त्यांची मागणी अडीच ते तीन लाख पाकिटांची आहे
यवतमाळ मध्ये प्रतिबंधित कापूस बियाणे जप्त
महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी निर्बंध असलेले कापूस बियाणे विक्रीस आणुन शेतकऱ्यांची फसवणूक होण्याच्या घटना मोठ्या प्रमाणात घडत आहेत.अशीच एक घटना तालुक्यातील कायर येथे उघडकीस आली असून चक्क सलुन च्या दुकानातून प्रतिबंधीत बियाणे विक्री करणाऱ्या सलुन चालकाला ताब्यात घेऊन 26 हजाराचे बियाणे जप्त करण्यात आले आहे.
शिरपूर पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या कायर येथे प्रतिबंधित कापूस बियाणे विक्री होत असल्याची गोपनिय माहिती पंचायत समितीचे कृषी अधिकारी संजय वानखेडे यांना माहिती मिळाली होती.मिळालेल्या माहितीनूसार शनिवारी दि.4 जून रोजी पंचायत समितीच्या पथकाने कायर येथिल एका सलूनच्या दूकानामध्ये सापळा रचून बनावट ग्राहक पाठवून प्रतिबंधीत मिनाक्षी बी.टी. बियाणाची मागणी केली असता प्रती पाकीट 850 प्रमाणे दोन पाकीटे 1700 रुपयाची आणून दिली.
त्याचवेळी पथकाने धाड टाकून घराची झाडझडती घेतली असता 25 हजार 920 रुपयांची 32 पॉकीटे आढळून आली त्यात मिनाक्षी बीटी बियाणे 545 bg असे वर्णन तसेच मागील बाजूस उत्पादक कंपनी सफल सिड अँड बायोटेक लिमीटेड,A-2 जूनी MIDC जालना व विपनन हिदुस्थान अग्रो सायन्स प्लॉट 401 vss नंददिप अपार्टमेंट पेट बाशीराबाद जेडीमेट्टा कूशबल्लापूर मेडचल मल्लकाजगिरी हेद्राबाद तेलंगना 500015 या कंपनीचे लॉट नंबर 50130 चे पॉकीट ताब्यात घेण्यात आले सदर बियाणे महाराष्ट्रात प्रतिबंधित असतांना विक्री करीत असल्यामूळे व विक्रीचा परवाना नसल्याने बियाणे जप्त करुन शिरपूर पोलीसात दोघाविरुद्ध तक्रार दाखल केली.
बियाणे अधिनियम 1966 कलम 19 सहकलम बियाणे नियंत्रण आदेश 1983 खंड 3 (1)नूसार बियाणे विक्री परवाना नसतानाही विक्री करणे बाबत शिरपूर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली आहे.