Ration card news : अनेक लोकांना नोकरी किंवा कामामुळे आपले गाव सोडावे लागते. अनोळखी शहरात गेल्यावर अगोदर नव्याने रेशनकार्ड काढावे लागत होते.पण आता आता तसे करण्याची गरज पडणार नाही. गाल, शहर वा अगदी राज्य बदलण्याची वेळ आली,तरी मूळ गावी काढलेले रेशनकार्ड आता नव्या ठिकाणी वापरता येणार आहे आहे.काय आहे योजना यासंबंधी माहिती आज आपण पाहणार आहोत.
ration card news |
One Nation One Ration scheme
कोरोना काळात टाळेबंदी झाल्याने लाखो लोकांना स्थलांतर करावे लागले.त्यामुळे रेशन वाटपात मोठ्या अडचणी निर्माण झाली होती.या पार्श्वभूमीवर देशभरात फक्त एकच शिधापत्रिका लागू करण्यासाठी मोदी सरकारने 2019 मध्ये ‘वन नेशन-वन रेशन कार्ड’ योजना सुरू केलेली होती.या योजनेमुळे आता रेशनकार्ड कोणत्या राज्यात बनवले आहे,याने कोणताही फरक पडणार नाही.या योजनेअंतर्गत मूळ गावी मिळणाऱ्या सुविधा या योजनेमुळे नव्या ठिकाणीही नागरिकांना सहज मिळणार आहेत.
One Nation One Ration Yojana
केंद्र सरकारने रेशनकार्ड आधार कार्डशी लिंक करण्याच्या सूचना केलेल्या आहेत.एकदा रेशनकार्ड आधारशी लिंक झाले, की हे रेशनकार्ड कुठेही वैध होणार आहे.राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत,स्थलांतरित लोकांसाठी,जे त्यांच्या तात्पुरत्या कामाच्या ठिकाणी रेशनपासून वंचित आहेत, त्यांच्यासाठी आधार कार्ड हे रेशनकार्डशी लिंक करणे आवश्यक होणार आहे.
कारण,त्यानंतरच कोणत्याही ठिकाणी रेशनचा लाभ घेता येऊ शकणार आहे.त्यानंतर “वन नेशन्स वन रेशन योजना सुरू होईल.
How to link Aadhaar – Ration Card
अशा प्रकारे करा आपल्या रेशन कार्ड ला आधार कार्ड लिंक कसे करावे ?
1) सर्वप्रथम uidai.gov.in या अधिकृत वेबसाइटवर जावे .
2) नंतर तुम्ही ‘Start Now’ वर क्लिक करावे .
3) नंतर Ration Card Benefit या पर्यायावर क्लिक करा.
4) आता तुमचा आधार कार्ड क्रमांक, रेशन कार्ड क्रमांक, ई-मेल एड्रेस आणि मोबाईल क्रमांक आदी माहिती भरावी
5) नंतर तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर ओटीपी (OTP) येईल.
6) ओटीपी भरल्यानंतर स्क्रीनवर प्रक्रिया पूर्ण झाल्याचा मेसेज मिळेल.
7) ही सर्व प्रक्रिया पूर्ण होताच, तुमचा आधार व्हेरिफाय होईल आणि तुमचं आधार कार्ड हे रेशन कार्डशी लिंक केले जाईल.