Independence Day Speech : सर्वप्रथम, तुम्हा सर्वांना भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा! मित्र हो, १५ ऑगस्ट हा भारताच्या. सन्मानाचा व अभिमानाचा दिवस आहे. या दिवशी १५ ऑगस्ट १९४७ रोजी आपला भारत देश इंग्रजांच्या अनेक वर्षांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला.
Independence day sheech |
15 August information Marathi
आपल्या भारताला स्वातंत्र्य सहजा सहजी मिळाले नाही. स्वातंत्र्यप्राप्तीसाठी अनेक स्वातंत्र्यसैनिकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. महात्मा गांधीजी, लोकमान्य टिळक, सुभाषचंद्र बोस, मंगल पांडे, भगतसिंग, सुखदेव, राजगुरू, लाला लजपत राय अशा अनेक महान स्वातंत्र्यवीरांती देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राण पणास लावले.त्या सर्व शूर स्वातंत्र्यसैनिकांमुळे आज आपण आपल्या देशात मुक्त श्वास घेत आहोत.
स्वातंत्र्यानंतर आपल्या देशाने कृषी, विज्ञान व तंत्रज्ञान, साहित्य, खेळ इ. सर्व क्षेत्रात चांगली प्रगती केली आहे. आज भारताकडे स्वतःचा आण्विक साठा आहे. भारत महासत्तेच्या दिशेने वाटचाल करीत आहे.तरीही आज भारतासमोर महागाई, भ्रष्टाचार, गरीबी सारख्या समस्या आ वासून आहेत. या समस्यांचे उच्चाटन पूर्ण झाल्याशिवाय देश सुखी, संपन्न व प्रगत होणार नाही.
15 ऑगस्ट मराठी भाषण
15 August Marathi Mahiti
Independence Day Speech
देशाला स्वातंत्र्य मिळून अनेक दशके लोटली असून या काळात प्रत्येक आघाडीवर देशाने जगभर आपला ठसा उमटवला आहे. विज्ञान, तंत्रज्ञान, आर्थिक, कृषी, शिक्षण, साहित्य, क्रीडा अशा सर्वच आघाड्यांवर भारताने उल्लेखनीय प्रगती केली आहे. अणु-सक्षम देश असलेल्या आपल्या देशाने अंतराळ क्षेत्रातही मोठे यश संपादन केले आहे. भारताने विकासाच्या प्रत्येक क्षेत्रात मोठी मजल मारली आहे. जगाचे लक्ष भारताकडे आहे.भारत केवळ क्रिकेटमध्येच नाही तर ऑलिम्पिकमध्येही चांगली कामगिरी करत आहे.
नुकत्याच झालेल्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये भारताने 61 पदके जिंकली त्यापैकी 22 सुवर्ण पदके होती.चला तर मग सर्वांनी एकत्र येऊन आपल्या भारत देशाला जगातील एक आदर्श देश बनवण्यासाठी प्रयत्न करूया.शेवटी म्हणावेसे वाटते की,
भारत माता की जय ! वंदे मातरम् !!