Close Visit Mhshetkari

New Ration card Rules : सावधान.. ‘यांचे’ रेशनकार्ड होणार बंद,पहा आपले नाव यादीत आहे का?

New Ration Card Rules : रेशन कार्डधारकांसाठी एक महत्वाची बातमी आहे.आजही देशात खूप गरीब लोक आहेत.लोकांना आर्थिक मदत करण्यासाठी सरकार अनेक फायदेशीर योजना आणत आहे.शिधापत्रिका ही देखील यापैकी एक योजना आहे. शिधापत्रिकेच्या मदतीने गरीब कुटुंबातील लोकांना शासकीय रास्त भाव दुकानातून स्वस्त दरात रेशन मिळू शकते.

New Ration Card Rules

उत्पन्न वाढूनही जे रेशनधान्य घेत असलेल्यांचं धान्य बंद होणार आहे. येत्या 1 सप्टेंबरपासून शिधापत्रिकांची पडताळणी होणार आहे.कौटुंबिक परिस्थिती सुधारूनसुद्धा अनेकजण जुन्या रेशनकार्डचा वापर करत वर्षानुवर्षे स्वस्त किमतीमध्ये धान्य घेतात.
धक्कादायक बाब म्हणजे अनेकजण स्वस्तातील रेशनधान्य घेऊन ते खासगी व्यक्तींना विकतात त्यामुळे जे गरजू आहेत त्यांना या धान्य मिळत नाही.अशा पद्धताने धान्य विकून ते सरकारची फसवणूक करत आहेत.माणसांना अन्न मिळत नाही काहीजण रेशनधान्य जनावरांना खाद्य म्हणू वापरल्याचंही उघड झाले आहे. तरीसुद्धा हे लोक रेशन धान्यावरील हक्क सोडण्यासाठी तयार नाहीत.(New Ration Card Rules)

हे पण पहा --  Ration card list : नवीन रेशनकार्ड यादी आली! पहा यादीत नाव आणि गावातील धान्य वाटप माहिती

रेशनकार्ड नवीन नियम | Ration Card New Rule

  1. सरकारच्या मोफत रेशन घेण्यासाठी काही अटी आहेत.
  2. रेशन कार्डधारकाकडे स्वकमाईने खरेदी केलेले 100 वर्ग मीटरचे फ्लॅट-घर नसावे.
  3. रेशनकार्ड धारकाकडे चाराकी वाहन -ट्रॅक्टर वाहन नसावे
  4. शस्त्राचा परवाना नसावा
  5. तसेच गावात 2 आणि शहरात 3 लाख रुपयांपेक्षा वार्षिक कौटुंबिक उत्पन्न नसावे.

सरकारने दिलेल्या अटीत जर नसाल,तर तुम्ही मोफत रेशन घेण्यास पात्र आहात.मात्र तसे नसेल तर तुम्हाला रेशन कार्ड जमा करावे लागणार आहे.

Ration card updates

फौजदारी गुन्हे होणार दाखल

1 सप्टेंबरपासून राज्यात धान्य निरीक्षकांमार्फत गावोगावी प्रत्येक शिधापत्रिकाधारकांची पडताळणी सुरू झाली असून वेळप्रसंगी संबंधितांवर फौजदारी कारवाई केली जाणार आहे.त्यासोबतच खोट्या माहितीद्वारे शासनाची फसवणूक केली म्हणून त्यांच्याकडून मागील धान्याची वसुलीदेखील केली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.(Ration Card updates) दरम्यान गावात तलाठी कार्यालय मध्ये अशा लोकांच्या याद्या आल्याची पण चर्चा सुरू झाली आहे.

Leave a Comment