New SIM Rules : आता Airtel, Jio, BSNL आणि Vi सारखे टेलीकॉम ऑपरेटर्स कडून सिम कार्ड खरेदी करणे अधिक सुरक्षित आणि सोपे होणार आहे नवीन प्रक्रियामुळे सदरील प्रक्रिया पेपरलेस झाली असून आता जास्त सोपे आणि सुरक्षित झाले आहे. नवीन नियमांमुळे पूर्ण प्रक्रिया पेपरलेस होणार आहे.
Aadhaar-based e-KYC, Self-KYC आणि OTP-based conversion चा समावेश करण्यात आला आहे. सदरील लिमामुळे फसवणुकीच्या घटना कमी होऊन सुरक्षा वाढणार असल्याची अपेक्षा सरकारला आहे.
केंद्र सरकारच्या दूरसंचार विभाग व माध्यमातून सिम कार्ड खरेदी विक्री वरती नवीन नियम तयार करण्यात आलेले सदरील नियम सर्व टेलिकास्ट कंपन्यांना बंधनकारक करण्यात आलेले आहेत.
New Rules for Buying SIM Cards
मित्रांनो आता सिमकार्ड दुकानात न जाता खरेदी करता येणार असून,नवीन नियमांनुसार, आता टेलिकॉम ऑपरेटरच्या ऑफिस किंवा सेंटरमध्ये न जाता नवीन सिम कार्ड खरेदी किंवा तुमचा टेलीकॉम ऑपरेटर बदलता येईल.
ऑनलाइन प्रक्रियेमुळे आपण जर नवीन सिम कार्ड घेऊ इच्छित असाल किंवा तुमचा टेलीकॉम ऑपरेटर बदलायचा असेल तर तुम्ही अगदी सहज ऑनलाइन तुमचे कागदपत्र व्हेरिफाय करू शकणार आहात.
सरकारने नवीन नियमांची माहिती X अर्थात ट्विटरच्या माध्यमातून दिलेली आहे. सदरील नियमांमुळे फसवणुकीच्या घटनांना आळा बसेल आणि सिम कार्ड खरेदी करणे सोपे होईल.
केंद्र सरकारने e-KYC आणि सेल्फ KYC प्रकिया सुरु केली आहे. सिम कार्ड खरेदी किंवा प्रीपेड वरून पोस्टपेड किंवा पोस्टपेड वरून प्रीपेड वर जाण्यासाठी टेलीकॉम कंपनीच्या ऑफिस मध्ये जाण्याची गरज फसणार नाही.
कसा होईल फायदा ?
नवीन नियमांमुळे ग्राहकांना ऑफलाईन कागदपत्रे दाखल करण्याची गरज नसणार आहे. यापूर्वी अनेकदा ग्राहकांनी दिलेल्या ओळखीच्या किंवा अॅड्रेस प्रूफचा सिम कार्ड विक्रेत्यांनी गैरफायदा घेतल्याच्या घटना समोर आल्या होत्या.
आपल्याला माहीत आहे की, बनावट सिम कार्डच्या घटना देखील दिवासंदिवस वाढत आहे.
KYC मध्ये झालेले तीन मोठे बदल
Aadhaar e-KYC : सदरील पेपरलेस प्रक्रिया असून टेलिकॉम कंपन्या तुमचे आधार डिटेल्स फक्त 1 रुपयांमध्ये व्हेरिफाय करणार आहे.
Self-KYC : आपण आपली KYC आधारच्या मदतीने ऑनलाइन पूर्ण करू शकता, ज्यामुळे तुमची ओळख पटेल. DigiLocker च्या मदतीने आपले डॉक्युमेंट ऑथेंटिकेट होतील.
OTP-based Conversion : आपण OTP ऑथेंटिकेशनच्या मदतीने प्रीपेड आणि पोस्टपेड मध्ये स्विच करू शकणार आहात.