Close Visit Mhshetkari

SIP Smart Tips : आता कमी गुंतवणुकीवरही मिळवता येतो सर्वाधिक रिटर्न्स ! पहा SIP करणाऱ्यांसाठी 10 स्मार्ट टिप्स ..

SIP Smart Tips : नमस्कार मित्रांनो, देशात एस आय पी गुंतवणूकदारांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.आपण जर एसआयपीच्या माध्यमातून म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्यास इच्छुक असाल, तर आपल्याला काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवावे लागतात आज आपण या लेखाद्वारे अशा 10 टिप्स बघणार आहोत की ज्याद्वारे आपण SIP मध्ये गुंतवणूक केल्यास नक्कीच फायदा होईल.

SIP Smart Tips Personal Investment

  • एस आय पी च्या माध्यमातून म्युच्युअल फंडात गुंतवणूक सुरू करण्यापूर्वी फंडाच्या आधीच्या कामगिरीचे मूल्यमापन करा. दीर्घकाळासाठी चांगला परतावा देणारा फंड किंवा एसआयपीची निवड करा.
  • मित्रांनो एसआयपी मध्ये गुंतवणूक करताना खंडातून आकारल्या जाणारी शुल्क महत्वाचे असते. ज्यांचा एक्सपेंस रेशियो कमी असेल असा फंड निवडावा. 
  • आपण निवडलेल्या एसआयपीच्या फंड मॅनेजरचा अनुभव आणि कौशल्य याचा सुद्धा विचार करावा एसपी मध्ये गुंतवणूक करताना फंड मॅनेजरचा ट्रॅक रेकॉर्ड नक्कीच तपासा.
  • जोखीम कमी करण्यासाठी आपण निवडलेला फंडमध्ये विविधता असली पाहिजे. जसे की स्मॉल कॅप, मिडकॅप त्याचबरोबर ब्लूचिप किंवा फ्लेझी कॅप इ.
  • गुंतवणूक करताना शिस्तबद्ध पद्धतीचा अवलंब करावा दीर्घकालीन उद्दिष्ट समोर ठेवून एसआयपी मध्ये गुंतवणूक करावी.
  • SIP सुरू करण्यापूर्वी तुमची आर्थिक उद्दिष्टे ठरवून कमी कालावधीसाठी, जास्त कालावधीसाठी, आपत्कालासाठी असे फंड तयार केले पाहिजे.
  • जोखीम घ्यायची तयारी आणि आर्थिक उद्दिष्टांशी जुळेल असा योग्य म्युच्युअल फंड निवडावा.
  • मित्रांनो नियोजित तारखेला बँक खात्यातून एसआयपी रक्कम कापली जाण्यासाठी ऑटो-डेबिट मोड वापरावा.
  • आपण गुंतवणूक केलेल्या एसआयपी ची माहिती मिळवण्यासाठी वेळोवेळी पोर्टफोलिओ तपासावा.
  • बाजारात अस्थिरता आणि चढ-उतार येत असतात, अशावेळी बाजारातील वातावरणाची पर्वा न करता गुंतवणूक करत राहा.
  • उत्पन्न वाडी बरोबर आपली एसआयपीची रक्कम वाढवावी परिणामी मोठा निधी निर्माण होण्यास मदत होते.
हे पण पहा --  AMC SIP : एएमसी एसआयपी म्हणजे काय? ज्याद्वारे कमिशन न देता मिळतो डायरेक्ट लाखो रुपये परतावा ! पहा सविस्तर...

Leave a Comment