Close Visit Mhshetkari

Xerox And Shilai Machine : झेरॉक्स व शिलाई मशीन योजनेअंतर्गत 100% अनुदान मिळणार

Xerox And Shilai Machine: नमस्कार मित्रांनो तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे. मित्रांनो सरकार तुम्हाला शिलाई मशीन तसेच झेरॉक्स मशीन साठी अनुदान देणार आहेत. आणि यासाठी तुम्हाला फक्त अर्ज करावा लागणार आहे.

Xerox And Shilai Machine Scheme

समाज कल्याण विभागाच्या वतीने 100 % अनुदानावर शिलाई मशीनसाठी अर्ज सुरु झाले आहे. दिनांक 31 मार्च 2024 पर्यंत पात्र अर्जदारांनी अर्ज करण्याचे आवाहन शासनाच्या वतीने करण्यात आले आहे. तुम्हाला जर 100 % अनुदानावर व झेरॉक्स मशीन पाहिजे असेल तर लगेच अर्ज सादर करा.

सदरील योजनेसाठी अर्ज करण्याचे स्वरूप काय आहे ? तुम्हाला कशा प्रकारे अर्ज करता येईल ? याविषयी सविस्तर माहिती ह्या लेखांमध्ये पाहूया.

झेरॉक्स – शिलाई मशीन योजना पात्रता 

वर्ग : मागासवर्गीय (OBC) आणि अपंग (PwD)

  1. वय : 18 ते 60 वर्षे
  2. वार्षिक उत्पन्न : ₹1 लाख पर्यंत
  3. निवास : महाराष्ट्रातील रहिवाशी असावा

अर्ज करण्याची प्रक्रिया

  • जिल्हा परिषद समाज कल्याण विभाग कार्यालयातून अर्ज फॉर्म मिळवा.
  • आवश्यक कागदपत्रांसह पूर्ण भरलेला अर्ज जमा करा.
  • https://rdd.maharashtra.gov.in/zilla-parishad यांच्या वेबसाइटला भेट द्या.
  • ‘शिलाई मशीन आणि झेरॉक्स मशीन योजना’ लिंकवर क्लिक करा.
  • ऑनलाइन अर्ज फॉर्म भरा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
आवश्यक कागदपत्रे
  • निवासस्थानाचा पुरावा
  • जातीचा दाखला (OBC साठी)
  • अपंगत्व प्रमाणपत्र (PWD साठी)
  • उत्पन्नाचा दाखला
  • आधार कार्ड
  • बँक खाते पासबुक

सूचना :- अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 मार्च 2024 आहे.अधिक माहितीसाठी जिल्हा परिषद समाज कल्याण विभाग कार्यालयाशी संपर्क साधा.

Leave a Comment