UPI Payment : नमस्कार मित्रांनो आपल्याला माहिती असेल की, एकीकडे पेटीएम आणि आरबीआय मध्ये वाद सुरू असतानाच फ्लिपकार्ट ने गुपचूप आपली यूपीआय पेमेंट सेवा भारतात लॉन्च केली आहे. कंपनीने यासाठी ॲक्सिस बँकेसोबत करार केला असून, आता शॉपिंग पेमेंट साठी थर पार्टी पेमेंट ॲपवर अवलंबून राहावं लागणार नाही. आता ग्राहकांना याबरोबरच पैसे ट्रान्सफर करण्यासाठी देखील फ्लिपकार्टचा वापर करता येईल.
Flipkart UPI Service in India
मित्रांनो आपल्याला माहिती असेल की फ्लिपकार्ट ग्रुपचे भारतात जवळपास 50 कोटीहून अधिक रजिस्टर युजर्स आहेत. तसेच फ्लिपकार्टच्या प्लॅटफॉर्म वरती 14 लाखाहून अधिक सेलर्स सुद्धा उपलब्ध आहेत.अशी माहिती कंपनीने दिली आहे. सध्या फ्लिपकार्ट, मिंत्रा, फ्लिपकार्ट होलसेल, फ्लिपकार्ट हेल्थ प्लस आणि क्लिअरट्रिप या सर्व सेवांचा समावेश आहे.आता या यूपीएल पेमेंट सेवेचा वापर फ्लिपकार्टची यूपीआय सेवा ही या सर्व प्लॅटफॉर्मवर करता येणार आहे.
फ्लिपकार्ट कंपनीने सदरील सेवा केवळ अँड्रॉइड स्विझर साठी उपलब्ध करून दिली आहे. कालांतराने ही सेवा सेवा आयओएस आणि वेब यूजर्ससाठी देखील उपलब्ध होईल, असे कंपनीने स्पष्ट केले आहे.
आपल्याला माहिती असेल की,फ्लिपकार्ट ची स्पर्धक असलेल्या ॲमेझॉन ने यापूर्वीच भारतात यूपीआय पेमेंट सर्विस सुरू केली होती त्यासोबत फुट डिलिव्हरी असणाऱ्या झोमॅटो सुद्धा काही दिवसापूर्वी उपाय भारतात लॉन्च केली होती.
Excited to announce the launch of the @Flipkart #UPI handle, which further boosts @_DigitalIndia & ongoing #DigitalTransformation. #FlipkartUPI is accessible to over 50 crore of our customers & many more nationwide within & outside of the Flipkart #marketplace. Powered by… pic.twitter.com/GlGrb0rg51
— Rajneesh Kumar (@rajneeeshkumar) March 3, 2024
How to use Flipkart UPI
फ्लिपकार्टच्या युजर्सना आपल्या Flipkart App मधून नवीन आयडी तयार करता येणार आहेत. त्यानंतर शॉपिंग पेमेंट करण्यासाठी किंवा पैसे ट्रान्सफर करण्यासाठी याचा वापर करता येईल. यामुळे फ्लिपकार्ट वर ऑर्डर करण्यासाठी दुसऱ्या पेमेंटची आवश्यकता भासणार नाही असं कंपनीने म्हटलं आहे.