Close Visit Mhshetkari

UAN EPFO : तुमच्या PF खात्यासाठी आवश्यक आहे UAN क्रमांक तो कोणता ? यूएएन सक्रीय कसा करायचा?

UAN EPFO : नमस्कार मित्रांनो तुमच्यासाठी महत्त्वाची माहिती आहे. खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्या तसेच सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ही महत्त्वाची बातमी आहे. खाजगी व सरकारी क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पगारा मधून ठराविक रक्कम पीएफ म्हणून ईपीएफओकडे जमा केली जाते. अशा परिस्थितीमध्ये ईपीएफओकडे प्रत्येक कर्मचाऱ्याला युएएन क्रमांक दिला जातो. 

युएएन क्रमांक सक्रिय कसा करायचा असतो ? व तो सक्रिय करण्यासाठी काय प्रोसेस आहे  याविषयी सविस्तर माहिती आपण ह्या लेखांमध्ये जाणून घेणार आहोत.

UAN EPFO Number Update 

आपल्याला पगारातून पीएफ वजा करून पीएफ खात्याचा मात करण्यात आलेली रक्कम तपासण्यासाठी व पीएफची रक्कम काढण्यासाठी तसेच पासबुक पाहण्यासाठी क्रमांक हा आवश्यक राहतो.

यूएएन क्रमांक पहिल्यांदा तुम्ही जिथे नोकरीला लागतो तिथे कंपनी किंवा तेथील व्यवस्थापनाकडून ईपीएफओच्या पोर्टलवर नोंदणी करून तयार केल्या जाणाऱ्या यूएएन क्रमांक कर्मचाऱ्याला सक्रिय करावा लागत असतो.

कर्मचाऱ्यांच्या पगारांमधून 12% रक्कम पीएफ खात्यामध्ये जमा होत असते.पीएफ खाते सक्रिय करण्यासाठी क्रमांक यूएएन आवश्यक आहे.

हे पण पहा --  EPFO News : EPFO मध्ये होणार काही बदल यामध्ये फायदा होईल का नुकसान काय आहेस सरकारचे संकेत ! पहा संपूर्ण माहिती

 UAN क्रमांक सक्रीय कसा करणार?

  1. यूएएन नंबर सक्रिय करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला ईपीएफओच्या कर्मचाऱ्यांच्या पोर्टलला भेट द्यावी लागेल.
  2. यूएएन सक्रीय करण्यासाठी प्रथम ईपीएफओच्या तिथे UAN सक्रीय करण्याच्या लिंकवर क्लिक कराववे लागेल. 
  3. आता UAN क्रमांक नोंदवावा लागेल,आधार कार्ड किंवा पॅन कार्ड यापैकी एक क्रमांक नोंदवावा, नाव, जन्मतारीख, मोबाईल नंबर, ईमेल आयडी भरल्यानंतर गेट अथॉरायझेशन पिन वर क्लिक करा.
  4. यानंतर ओटीपी टाकून UAN पोर्टलवर खाते सक्रीय होईल. 

Leave a Comment