Close Visit Mhshetkari

Top-Up Loan: टॉप-अप लोन म्हणजे काय ? काय आहे निकष व अटी ; असा करा अर्ज

Top-Up Loan : आपल्या आर्थिक गरजा कर्ज पूर्ण करण्यासाठी आपण बँकेकडे लोन घेत असतो . किंवा नॉन बँकिंग फायनान्स कंपन्यांकडून लोन घेत असतो. आपण जास्त करून वैयक्तिक कर्ज प्रामुख्याने घेत असतो

पण याव्यतिरिक्त जर आपल्याला स्वतःचे घर घ्यायचे असेल आपण होम लोन घेतो होम लोनच्या मदतीने प्रत्येक लोक आपल्या घराचे स्वप्न पूर्ण करतात परंतु आपल्या काही गरजा असतात की त्या पूर्ण करण्यासाठी आपल्याला परत कर्ज घ्यावे लागते म्हणजे फर्निचर, इंटरियर डिझाईन, घर दुरुस्ती यासारख्या गरजा पूर्ण करण्यासाठी पैशाची गरज लागते आणि अशा परिस्थितीमध्ये आपण टॉप-अप कर्ज घेत असतो.

 टॉप अप लोन म्हणजे काय?

टॉप-अप लोन म्हणजे, तुम्ही आधीच घेतलेल्या गृहकर्जावर अतिरिक्त रक्कम मिळवण्याची सुविधा आहे. . टॉप-अप लोन हे एक प्रकारचे वैयक्तिक कर्ज आहे जे तुम्हाला कमी व्याजदरात उपलब्ध असते.

तुम्हाला वित्तीय संस्थांच्या माध्यमातून ग्राहकांना टॉप उप कर्जाची सुविधा उपलब्ध होते टॉप-अप लोणचे स्वरूपे प्रसनल लोन सारखे असते यामध्ये त्याची परतफेड कालावधी गृह कर्ज म्हणजे होम लोन वर अवलंबून असतो

हे पण पहा --  Bank loan offers : मोठी बातमी.. या बँकेचा ग्राहकांना पुन्हा झटका; होम लोन,कार लोन,पर्सनल लोन महागले; पहा डिटेल्

निकष व अटी पूर्ण करावे लागतील

  • तुमच्याकडे वैयक्तिक उत्पन्न पाहिजे.
  • तुमचे गृहकर्ज नियमितपणे भरावे.
  • तुमचा सिबिल स्कोअर चांगला पाहिजे.
  •  होम लोनच्या रकमेच्या टॉप-अप लोनची रक्कम आणि प्रॉपर्टीच्या मार्केट व्हॅल्यूच्या 70% पर्यंत असू शकते.
  • बँक तुमचे रेकॉर्ड चेक करत असते.

यासाठी तुम्ही कसा करू शकता अर्ज? 

तुम्ही ज्या बँक मध्ये लोन घेतले आहे त्या बँकेला भेट देणे आवश्यक आहे बँकेच्या वेबसाईटवर जाऊन त्याच्या माध्यमातून तुम्ही टॉप अप लोन साठी अर्ज करू शकता तुमच्या होम लोन वर टॉप-अप उपलब्ध असल्यामुळे लोन घेतल्यानंतर तुम्हाला होम लोनच्या हप्त्यासोबत टॉप-अपचा देखील आपला भरणे आवश्यक आहे

आवश्यक  कागदपत्रे  
  1. गृहकर्जाचे करारपत्र
  2. गृहकर्जाच्या हप्त्यांचे चालू पेमेंटचे पुरावे
  3. उत्पन्नाचे पुरावे
  4. सिबिल स्कोअरचे अहवाल
  5. मालमत्तेचे 7/12 उतारे
  6. मालमत्तेचा सर्व्हे रिपोर्ट
Top up loan benefits 
  • तुम्हाला तुमच्या घराच्या नूतनीकरण, दुरुस्ती, बांधकाम, किंवा इ सर्वसाधारण तुम्हाला वैयक्तिक गरजेसाठी पैसे मिळतात.
  • तुम्हाला कमी व्याजदरात पैसे मिळतात 
  • अर्ज प्रक्रिया सोपी आहे.

This article Written by Swati Ghuge from Maharashtra.She is famous YouTuber, Website Developer and Administrator of liveupdate18.com

Leave a Comment