Close Visit Mhshetkari

Tax Free FD पेक्षा जास्त व्याज देईल पोस्टाची ‘ही’ योजना! मुलांच्या नावानंही करू शकता गुंतवणूक; पहा सविस्तर …

Tax Free FD : नमस्कार मित्रांनो आपल्याला माहिती आहे की फिक्स डिपॉझिट हा गुंतवणुकीचा आजही लोकप्रिय प्रकार आहे. पाच वर्षाच्या एफडीवर टॅक्स फ्री एफडी (Tax Free FD) असे संबोधले जाते. 

अनेक लोक कर वाचवण्यासाठी सदरील एफडी चा आधार घेतात, पण पोस्ट ऑफिस ची एक अशी स्कीम आहे की, ज्या आधारे तुम्हाला 5 वर्षाच्या एफडी पेक्षा जास्त परतावा आणि टॅक्स सुद्धा वाचवता येईल.तर चला पाहूया सविस्तर माहिती

National Savings Certificate

मित्रांनो आपण ज्या योजनेविषयी माहिती पाहणार आहोत त्याचे नाव आहे. राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र अर्थात National Savings Certificate होय. ती सुद्धा एक एफडी सारखी डिपॉझिट स्कीम असून पाच वर्षासाठी पैसे आपण यामध्ये जमा करू शकतो. सध्या या योजनेत 7.7% दराने व्याजदर दिला जात आहे.

Tax Free FD वर किती व्याज?

मित्रांनो सध्या जर टॅक्स फ्री एफ डी विषयी विचार करायचा झाला तर विविध बँकात एफडी वरती खालील प्रमाणे व्याजदर देण्यात येत आहे.

  • पोस्ट ऑफिस – ७.५%
  • स्टेट बँक – ६.५% 
  • पंजाब नॅशनल बँक – ६.५%
  • बँक ऑफ इंडिया – ६.५%
  • HDFC – ७%
  • ICICI – ७%  

भारतातील कोणताही नागरिक पोस्टाच्या या नॅशनल सेविंग सर्टिफिकेट योजनेत गुंतवणूक करू शकतो. जर आपल्याला आपल्या मुलाच्या नावावर खाते उघडायचं असेल तरी, सुद्धा आपण ते उघडू शकता.साधारणपणे 10 वर्षांपेक्षा जास्त वयाचे मूल देखील स्वतःच्या नावाने NSC खरेदी करू शकते. विशेष म्हणजे यामध्ये कुटुंबातील दोन-तीन व्यक्तींचे संयुक्त खातेही उघडता येते.  

हे पण पहा --  Investment Tips : महिलांसाठी जबरदस्त आहे 'ही' सरकारी योजना! मिळतेय जबरदस्त व्याज; पहा महत्त्वाच्या गोष्टी ...

किती गुंतवणूक करू शकता? 

आपल्याला राष्ट्रीय बचत योजनेत गुंतवणूक करायची झाल्यास एक हजार रुपयांपासून शंभरच्या पटीत गुंतवणूक करता येते जास्तीत जास्त गुंतवणुकीवर मर्यादा नाही ही योजना अवघ्या पाच वर्षात मॅच्युअर होते.

वार्षिक चक्रवाढ व्याज आणि हमी परतावाही चांगला मिळतो.आपण गुंतवणुकीच्या वेळी लागू होणाऱ्या खासदारानुसार पाच वर्षासाठीचा व्याजदर मोजला जातो व्याजदर बदलले तरीही त्याचा परिणाम आपल्या खात्यावर होत नाही.

Tax Savings Post Scheme

एनएससीमध्ये जमा केलेल्या रकमेवर कलम 80C अंतर्गत कर सूट उपलब्ध आहे. आपल्याला आयकर भरताना दरवर्षी साधारणपणे 80c अंतर्गत दरवर्षी 1.5 लाख रुपयांपर्यंतच्या ठेवींवर कर सूट शकते. 

पोस्टाच्या या योजनेचे अंतिम महत्त्वाचे जे वैशिष्ट्ये सांगायचे झाल्यास इतर योजना प्रमाणे पाच वर्षांपूर्वी या योजनेतील आंशिक पद्धतीने पैसे काढता येत नाहीत.संपूर्ण पैसे एकदाच पाच वर्षानंतर काढावी लागतात.

Leave a Comment