Close Visit Mhshetkari

Systematic withdrawal plan : गुंतवणुकीची नवीन योजना आली ! निवृत्तीनंतर मिळणार दरमहा 1.5 लाख रुपयांसह 4.5 कोटी …

Systematic withdrawal plan : नमस्कार मित्रांनो आपल्याला माहिती असेल की, सध्याच्या स्थितीत SIP च्या माध्यमातून म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याच्या मार्गाचा अवलंब करत आहेत.बरेच कर्मचाऱ्यासह सामान्य नागरिक सुद्धा गुंतवणुक करत आहेत.

आज आपण एसआयपी पेक्षा विरुद्ध असणाऱ्या एका नवीन योजनेविषयी माहिती बघणार आहोत त्याचं नाव आहे SWP. आता हे SWP काय आहे? हे समजून घेऊया सविस्तर.

What is SWP Investment ?

मित्रांनो आपण जसे Mutual Funds मध्ये SIP करून मोठी संपत्ती निर्माण करतो, तसेच SWP करून ती जमा झालेली रक्कम हळूहळू काढने यालाच SWP म्हणतात.
सदरील SWP ही SIP च्या पूर्णपणे विरोधी आहे. सद्यस्थितीत SIP प्रमाणेच SWP सुद्धा खूप प्रचलीत होत आहे.

SWP ची गरज काय आहे ?

तर आपण केलेल्या गुंतवणूकीचा योग्य वापर करणे,आपली ध्येये (Goals) पूर्ण करता आली पाहिजे.

 एक उदाहरण घेऊन समजून घेऊयात.

गणेश 25 व्या वर्षी 20000 रु ची SIP करतो आणि तो पुढील 20 वर्ष गुंतवणूक करत राहतो.

हे पण पहा --  Digital currency : आता भारतात येणार नवीन तंत्रज्ञान ... पैसे देवाणघेवाण झाली सोपी; बँक खात्याची गरज नाही

गणेश ची 20 वर्षात एकूण गुंतवणूक 48 लाख रुपये झाली असेल, व त्याचे मूल्य 2.5 कोटी च्या जवळ असेल.

गणेश आता 45 वर्षाचा झाला असेल, त्याला कुटुंबाच्या जबाबदाऱ्या वाढल्या असतील व कदाचित त्याला काम न करता मनसोक्त जीवनाचा आनंद घ्यायचा असेल

गणेश आपली SIP बंद करतो व 1.5 लाख रुपये दर महिन्याला काढायचे ठरवतो म्हणजेच SWP करतो, व हे ते पूढील 40 वर्ष करत राहतो.

40 वर्षांमध्ये गणेश ने एकूण 7 कोटी रु काढलेले असतील व अजून त्याची बरीच गुंतवणूक शिल्लक असेल.

अशा प्रकारे आपण SWP चा वापर करून आपले ध्येये पूर्ण करु शकतो व संपत्तीचा आनंद पण घेऊ शकतो.
आशा आहे आपल्याला SWP ही संकल्पना समजली असेल.

This article Written by Swati Ghuge from Maharashtra.She is famous YouTuber, Website Developer and Administrator of liveupdate18.com

Leave a Comment