Close Visit Mhshetkari

Smart Prepaid Meter : महावितरण ‘या’ तारखेपासून बसवणार ‘स्मार्ट प्रिपेड मीटर’ ! खर्च फिटिंग रिचार्ज इन्स्टॉलेशन कसे असणार? पहा सविस्तर ….

Smart Prepaid Meter : नमस्कार मित्रांनो आपल्याला माहिती असेल की महावितरण कंपनीकडून राज्यभरात लवकरच स्मार्ट मीटर बसवण्यात येणार आहे.साधारणपणे 2 कोटी 81 लाख ग्राहकांना जुने मीटर बदलून नवीन मीटर बसवण्यात येणार आहे. 

सर्वप्रथम शासकीय कार्यालय वसाहती तसेच संस्थांमध्ये सदरील मीटरची प्रक्रिया राबविण्यात येणार समोर आलेल्या माहितीनुसार, दिनांक 15 मार्च 2024 पासून सदरील स्मार्ट प्रीपेड मीटर बसवण्यात येणार आहे.

Smart Prepaid Electricity Meter

मित्रांनो राजकीय राज्यात चार खाजगी वीज कंपन्या द्वारे महावितरणने २ कोटी २४ लाख ६१ हजार ३४६ स्मार्ट प्रिपेड मीटरचे कंत्राट २६ हजार ९२३ कोटी ४६ लाखांमध्ये दिले आहे. मे.अदानीला भांडूप, कल्याण, कोंकण, बारामती, पुणे झोनमधील १३ हजार ८८८ कोटी ७३ लाख रुपयांचे कंत्रात देण्यात आले आहे.

मित्रांनो लोकांच्या मनात फार मीटर विषयी अनेक शंका निर्माण झालेले आहेत ज्यामध्ये सदरील मीटरचे रिचार्ज कसे करायचे? सर्दरीत मीटर बसवताना खर्च कोणी करायचा त्याचबरोबर वीज आकार कसा असणार ? स्मार्ट मीटर १५ मार्च २०२४ पासून महावितरण लावणार होती, परंतु ही तारीख जवळ आली असल्याने नक्की सुरूवात कधी होणार याकडे ग्राहकांचे लक्ष आहे.

हे पण पहा --  Smart meter : वीज खंडित होण्याची कटकट थांबणार! शेतकरी अन् गावासाठी आता लवकरच प्रिपेड मीटर

How work smart Meter

  1. सदरील प्रीपेड स्मार्ट मीटर मोबाईल प्रमाणे ग्राहकांना रिचार्ज करावी लागेल
  2. विज बिल वापरा संदर्भात सर्व माहिती मोबाईल ॲप मध्ये पाहता येणार
  3. विज बिल रिचार्ज करण्या संदर्भात अनेक पर्याय उपलब्ध असून यूपीआय पेमेंट द्वारे कुठेही केव्हाही पैसे भरता येणार.
  4. ग्राहकाला आपला वीजवापर कमी-जास्त करता येईल.
  5. विजेचा वापर जसा वाढेल, तसे रिचार्जचे पैसे संपत जातील.
  6. ट्रिपल स्मार्ट मीटर मधील रिचार्ज संपल्यानंतर आपला वीजपुरवठा ऑटोमॅटिक बंद होईल.
  7. वीजवापराची आणि किती पैसे उरले याची माहिती मोबाईलवर आधीच मिळेल आणि नव्याने पैसे भरणे सुलभ होईल.
  8. ग्राहकाचे पैसे संपत आल्यावर वितरण कंपनीकडून मोबाइलवर sms येईल.
  9. मानवी हस्तक्षेप कमी होऊन ग्राहकांना अचूक विज बिल प्राप्त होऊन वीजबिला संदर्भात येणाऱ्या तक्रारी आपोआप कमी होईल.

This article Written by Swati Ghuge from Maharashtra.She is famous YouTuber, Website Developer and Administrator of liveupdate18.com

4 thoughts on “Smart Prepaid Meter : महावितरण ‘या’ तारखेपासून बसवणार ‘स्मार्ट प्रिपेड मीटर’ ! खर्च फिटिंग रिचार्ज इन्स्टॉलेशन कसे असणार? पहा सविस्तर ….”

  1. घरगुती मीटर प्रमाणे सर्व शेती धारकांना सुद्धा या पद्धतीचे मीटर बसवल्यास त्यांना अव्वाच्या सव्वा बिल येणार नाही व त्यांची वीज कापण्यापासून तसेच आर्थिक नुकसान होण्यापासून थांबवता येईल.

    Reply
  2. मीटर मध्ये बिघाड झाल्यास किंवा बंद पडल्यास तो खरंच कोण भरणार?

    Reply

Leave a Comment