Close Visit Mhshetkari

SmallCap Mutual Funds : गेल्या 5 वर्षात सर्वाधिक परतावा देणारे 5 स्मॉलकॅप फंड; तुम्हीही गुंतवणूक केली का?

Smallcap Mutual Funds : ईटी म्युच्युअल फंड्स म्हणजेच ET Mutual Funds ने दैनंदिन रोलिंग परताव्याच्या आधारे गेल्या 5 वर्षातील 199 इक्विटी योजनांचा अभ्यास करून त्यांच्यातील सर्वाधिक परतावा देणाऱ्या फंडची यादी जाहीर केली आहे.त्यामध्ये सामावेश असलेले 5 म्युच्युअल फंड्स पुढील प्रमाणे…

Top Smallcap Mutual Funds 

Bank of India Small Cap Fund : बँक ऑफ इंडिया स्मॉल कॅप फंडने पाच वर्षांत 30.40 टक्क्यांचा परतावा दिला. डिसेंबर 2018 मध्ये लाँच झालेली ही योजना 29 फेब्रुवारी 2024 पर्यंत 919 कोटी रुपयांच्या फंडचे व्यवस्थापन करते आहे.

Edelweiss Small Cap Fund :- दैनंदिन रोलिंग रिटर्न्सच्या आधारे एडलवाईस स्मॉल कॅप फंड या योजनेने पाच वर्षांत 28.12 टक्क्यांचा परतावा दिला. फेब्रुवारी 2019 मध्ये सुरू झालेली ही योजना 3,134 कोटी रुपयांच्या फंडचे व्यवस्थापन करते आहे.

Canara Robeco Small Cap Fund :- दैनंदिन रोलिंग रिटर्न्सच्या आधारे कॅनरा रोबेको स्मॉल कॅप फंडने 5 वर्षांत 26.32 टक्क्यांचा परतावा दिला.फेब्रुवारीमध्ये सुरू झालेली ही योजना 9,402 कोटी रुपयांच्या फंडचे व्यवस्थापन करते आहे.

Tata Small Cap Fund :- टाटा स्मॉल कॅप फंड या योजनेने दैनंदिन रोलिंग रिटर्न्सवर आधारित पाच वर्षांमध्ये 25.94 टक्के परतावा दिला. नोव्हेंबर 2018 मध्ये सुरू झालेली ही योजना 6,289 कोटी रुपयांच्या फंडचे व्यवस्थापन करते आहे.

Invesco India Smallcap Fund :- इन्वेस्को इंडिया स्मॉलकॅप फंड ने ऑक्टोबर 2018 मध्ये दैनंदिन रोलिंग रिटर्नवर आधारित 5 वर्षांत 25.34% परतावा दिला. ही योजना 3,705 कोटी रुपयांच्या फंडचे व्यवस्थापन करते आहे.

रोलिंग परतावा | Rolling returns

रोलिंग रिटर्न्स हे ठराविक कालावधीतील परताव्यांची सरासरी असते.ET Mutual Funds अभ्यासासाठी दैनंदिन रोलिंग रिटर्न महत्वाचे मानले जाते. फंडाच्या विश्लेषणसाठी पॉइंट-टू-पॉइंट रिटर्न्स किंवा ट्रेलिंग रिटर्नचा विचार केला जातो.गुंतवणूक तज्ज्ञ म्युच्युअल फंड योजनांच्या कार्यक्षमतेचे विश्लेषण करण्यासाठी परतावा महत्वाचा घटक मानतात.

Tip : – सदरील माहिती फक्त शैक्षणिक उद्देशाने दिलेली आहे. म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या अर्थतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.आम्ही कोणत्याही कंपनीचे किंवा शेअरचे प्रमोशन करत नाही.

This article Written by Swati Ghuge from Maharashtra.She is famous YouTuber, Website Developer and Administrator of liveupdate18.com

Leave a Comment