Close Visit Mhshetkari

SIP Pause Vs Close : एसआयपी पॉज करावी की बंद, अचानक आर्थिक संकट आल्यास काय करावे कोणता पर्याय राहील फायदेशीर ?

SIP Pause Vs Close : नमस्कार मित्रांनो,आज आपण सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन म्हणजेच एसआयपी विषयी एक महत्त्वपूर्ण आणि उपयुक्त माहिती बघणार आहोत.जर आपण एसआयपी सुरू केलेली असेल आणि आपल्याला अत्यंत महत्त्वाचे काम पडते.

तर अशावेळी आपण आपली एसआयपी बंद करतो.अडचणीच्या काळात आपण सुरू केलेली एसआयपी बंद करावी किंवा पॉज करावी , हा प्रश्न आपल्याला पडतो तर पाहूया कोणता मार्ग राहील सर्वात उपयुक्त.

SIP Pause Vs SIP Close 

आज-काल म्युच्युअल फंडाच्या माध्यमातून एस आय मध्ये गुंतवणूक करणे अतिशय लोकप्रिय बचतीचा मार्ग झालेला आहे.सरकारी कर्मचाऱ्यासह सेवानिवृत्त कर्मचारी त्याचबरोबर खाजगी क्षेत्रात काम करणारे बहुतांश लोक म्युच्युअल फंडाच्या माध्यमातून एसआयपी मध्ये गुंतवणूक करत आहेत.

अल्प बचतीतूनही एसआयपी सुरू करता येते आणि दीर्घकाळात त्या माध्यमातून मोठा फंड तयार करता येतो. हेच कारण आहे की आजच्या काळात लोक एकाच वेळी अनेक SIP चालवत आहेत.

समजा आपण पाच हजार ते दहा हजार रुपयाची एसआयपी सुरू केली आणि अचानक तुमच्यासमोर महत्त्वाचे काम निघून एसआयपी चालू ठेवणे अवघड होईल, तेव्हा sip बंद करावी ही पॉज करावी हा प्रश्न आपल्यासमोर उभा राहतो.अशा वेळेस आपण काय करावे ?

SIP Pause म्हणजे काय?

आर्थिक संकटाच्या काळात आपल्याला एसआयपी पूर्णपणे बंद न करता पॉज करता येते,म्हणजे ठराविक काळा कालावधीसाठी आपण आपले हप्ते किंवा एसआयपी रक्कम भरणे थांबवू शकतो.

या अगोदर सदरील सेवा ही एक ते तीन महिन्यासाठी होती परंतु आता सहा महिन्यापर्यंत मर्यादा वाढवण्यात आलेली आहे म्हणजे आपली एस आय पी आपण सहा महिन्यासाठी तत्पुरत्या स्वरूपात थांबवू शकतो.

हे पण पहा --  SIP Smart Tips : आता कमी गुंतवणुकीवरही मिळवता येतो सर्वाधिक रिटर्न्स ! पहा SIP करणाऱ्यांसाठी 10 स्मार्ट टिप्स ..

सदरील सुविधेचा लाभ घेण्यासाठी आपल्याला अॅसेट मॅनेजमेंट कंपनी म्हणजेच एएमसीला ‘पॉज’ करण्याची विनंती करावी लागेल. एसआयपी पॉज करण्याच्या अर्ज कंपनीला केल्यानंतर कंपनी किती दिवस फोनची सुविधा देत आहे? हे महत्त्वाचे ठरते तुमची विनंती मान्य केली तर तुमच्याकडून ठराविक कालावधीसाठी हप्ता आकारला जाणार नाही,परंतु पाऊस कालावधी संपल्यानंतर आमचे आपोआप तुमच्या खात्यातून कपात होण्यास सुरुवात होईल.

पॉज आणि बंदचा पर्याय कधी निवडावा?

मित्रांनो सदरील सुविधेचा लाभ घेण्यासाठी काही कारणांची तरतूद करण्यात आली आहे जसे की मेडिकल इमर्जन्सी जॉब गमावणे अचानक उद्भवलेला खर्च लग्न घर खरेदी किंवा इतर कौटुंबिक कारणांचा समावेश आहे.

थोडक्यात वरील परिस्थितीत तुम्ही एसआयपी पॉजचा पर्याय निवडू शकता.जर आर्थिक अडचणी अशा असतील की तुमची परिस्थिती कधी सामान्य होईल हे तुम्हाला माहित नसेल तरच तुम्ही एसआयपी बंद करण्याचा निर्णय घेऊ शकता.

एसआयपी मध्येच बंद केल्यानंतर आपल्या ध्येय साध्य होणार नाही परंतु एसआयपी पॉज केल्यानंतर काही दिवसाने हप्ते भरण्यास सुरुवात केल्यानंतर आपल्याला नफा मिळण्यास सुरुवात होईल.शेअर बाजारात तेजी असेल तर, या पॉजनंतरही तुम्हाला चांगला परतावा मिळू शकतो. 

(टीप – मित्रांनो , सदरील माहिती ही फक्त शैक्षणिक उद्देशाने दिलेले असून विविध स्त्रोताकडून मिळालेल्या तथ्याच्या आधारे विश्लेषण करण्यात आलेले आहे शेअर बाजारात गुंतवणूक करण्यापूर्वी आपण तज्ञ जाणकार व्यक्तीचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

Leave a Comment