Close Visit Mhshetkari

SIP Investment : एसआयपी मध्ये गुंतवणूक करताना फक्त ‘ही’ चार सूत्रे पाळा आणि मालामाल व्हा; मिळवा दुप्पट,चौपट परतावा !

SIP Investment : नमस्कार मित्रांनो सध्याच्या काळात एसआयपी दारे फंडात गुंतवणूक करणे अतिशय सुरक्षित आणि चांगला पर्याय मानला जात आहेत.आपल्या सोयीनुसार गुंतवणूक करता येते आपण जर दीर्घ कालावधीसाठी गुंतवणूक केली,तर चांगला परतावा मिळू शकतो. विशेष म्हणजे एसआयपी द्वारे आपल्याला चक्रवाढ व्याजाचा फायदा सुद्धा मिळतो. त्यामुळे गुंतवलेल्या पैशाचे मूल्य अधिक वाढतात.

SIP Investment Tips

मित्रांनो तज्ञ च्या मतानुसार एसआयपी मध्ये गुंतवणूक केल्यानंतर आपल्याला साधारणपणे 12% पर्यंत गुंतवणूक परतावा मिळू शकतो. कधीकधी हा परतावा 15% पर्यंत सुद्धा असू शकतो.

सध्या सरकारी गुंतवणूक योजना एवढ्या मोठ्या प्रमाणे रिटर्न्स देत नाहीत, मात्र एसआयपी करताना काही गोष्टींची काळजी घ्यावी लागते. याविषयीच आज आपण या लेखात सविस्तर माहिती पाहणार आहोत.

दीर्घ मुदतीसाठी गुंतवणूक

एसआयपी मध्ये गुंतवणूक करण्याचा सर्वात महत्त्वाचा फॉर्मुला म्हणजे आपण यामध्ये दीर्घ काळासाठी गुंतवणूक करणे आवश्यक असते.मित्रांनो आपण जर 15,20,25 वर्षे किंवा यापेक्षा अधिक काळासाठी केल्यास तुम्ही जमा केलेल्या रकमेचे मूल्य अधिक आपल्याला वाढलेले दिसते आपण महिन्याला अतिशय कमी रक्कम एस आय पी काढून ही गुंतवणूक करू शकता.

गुंतवणुकीसाठी शिस्त

आपल्याला जर गुंतवणुकीच्या माध्यमातून पैसे कमवायचे असल्यास आपल्याला शिस्त पाळणे अतिशय महत्त्वाचे असते.आपण एकदा गुंतवणूक केल्यास काहीही झाले तरी गुंतवणूक थांबू नये.दीर्घ मदतीच्या एसआयपी वर महिन्याला गुंतवणूक चालू ठेवावी. बरेच लोक आपत्कालीन परिस्थितीत यासाठी मधील पैसे काढतात,त्यामुळे आपला मोठ्या प्रमाणावर तोटा होतो आणि जे रिटर्न्स आपल्याला मिळायचे असतात, ते मिळत नाहीत. त्यामुळे कोणतेही परिस्थितीत आपण पडलेली एसआयपी बंद करू नये.

हे पण पहा --  Systematic withdrawal plan : गुंतवणुकीची नवीन योजना आली ! निवृत्तीनंतर मिळणार दरमहा 1.5 लाख रुपयांसह 4.5 कोटी ...

लहान रकमेपासून एसआयपी सुरवात

आपण जर दीर्घ मुदतीसाठी एसआयपी करत असाल तर,महिन्याला मोठ्या रकमेची एसआयपी काढू नका, कारण कालांतराने एसआयपी मध्ये गुंतवणूक केलेली रक्कम जास्त असल्यास, हप्ते भरण्यास अडचणी निर्माण होतात.परिणामी एसआयपीतून मिळणारा पैसा किंवा रिटर्न्स मिळत नाही.अगदी कमी पैशात म्हणजे ५०० रूपया पासून सुद्धा आपण यासाठी मध्ये गुंतवणूक करू शकता. 

Top up SIP

एसआयपी च्या माध्यमातून म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्यासाठी आपण एसआयपी मोड निवडताना टॉपिक पर्याय अवश्य वापरावा.दरवर्षी पगारवाढीनंतर 10% एसआयपी गुंतवणूक वाढ करावी.

थोडक्यात तुम्ही करत असलेल्या एसआयपीमध्ये प्रत्येक वर्षाला थोडी-थोडी वाढ करायला हवी. आपण sip वर प्रत्येक वर्षाला 10 किंवा 5 टक्क्यांनी वाढ करत असाल तर आपल्याला भविष्यात जबरदस्त फायदा मिळू शकतो.

This article Written by Swati Ghuge from Maharashtra.She is famous YouTuber, Website Developer and Administrator of liveupdate18.com

Leave a Comment