Close Visit Mhshetkari

Senior citizen schemes : ज्येष्ठ नागरिकांसाठी चालवण्यात येणाऱ्या महत्त्वपूर्ण सहा योजना ! पहा त्यांचे फायदे व सविस्तर माहिती …

Senior citizen schemes : नमस्कार मित्रांनो,भारतीय संस्कृतीमध्ये ज्येष्ठ नागरिकांना आदराचे स्थान आहे. वय ६० वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त वयाच्या पुरुषांना आणि महिलांना ‘ज्येष्ठ नागरिक’ म्हटले जाते.

महाराष्ट्रात ज्येष्ठ नागरिकांना सहाय्य करण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारतर्फे विविध योजना राबविल्या जातात.आज आपण ज्येष्ठ नागरिकांसाठी उपयुक्त असलेल्या सहा योजना आणि त्यांच्या फायद्यांबद्दल माहिती घेणार आहोत.

Senior citizens Schemes 2024

  • ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘वृद्धाश्रम’ योजना
  • ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘मातोश्री वृद्धाश्रम’ योजना
  • ६० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या ज्येष्ठ नागरिकांना ओळखपत्र
  • ज्येष्ठ नागरिकांसाठी बस भाड्यात (राज्य परिवहन महामंडळ) सवलत
  • संजय गांधी निराधार अनुदान योजना
  • श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना
  • इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना
  • ज्येष्ठ नागरिकांसाठी राष्ट्रीय हेल्पलाईन

इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धावस्था निवृत्ती वेतन योजना

वय 65 वर्षे आणि त्यापेक्षा जास्त वय असलेले ज्येष्ठ नागरिक पात्र आहेत. दर महिन्याला ₹1000 पेन्शन मिळते.विधवा महिला आणि अपंग व्यक्तीही पात्र आहेत.

ज्येष्ठ नागरिक कार्ड (सीनियर सिटीजन कार्ड)

मित्रांनो महाराष्ट्रातील सीनियर सिटीजन किंवा ज्येष्ठ नागरिकांसाठी या योजनेच्या माध्यमातून प्रवासासाठी सवलत मिळते.एसटी प्रवासात सवलत,रुग्णालयांमध्ये 30% सवलत (60 वर्षांपेक्षा जास्त वय)

हे पण पहा --  Atal Pension Yojana : दरमहा फक्त 210 रुपये जमा करा आणि मिळवा वार्षिक 60,000 रुपये पेन्शन

प्रधानमंत्री वय वंदना योजना

वय 60 वर्षे आणि त्यापेक्षा जास्त वय असलेले नागरिक पात्र आहेत.10 वर्षांची योजना, 3 महिने, 6 महिने आणि वार्षिक पेन्शन पर्याय उपलब्ध.वार्षिक 8% व्याज दराने परतावा मिळतो. या योजनेत ₹1000 ते ₹15 लाख पर्यंत गुंतवणूक करता येते.

ज्येष्ठ नागरिक बचत योजना

निवृत्तीनंतर साधारणपणे 60 वर्षे आणि त्यापेक्षा जास्त वय असलेले नागरिक या योजनेसाठी पात्र आहेत. बचत स्वरूपातील या योजनेत निवृत्तीनंतर उत्पन्नाचे साधन आहे.सदरील भारत सरकारद्वारे राबवली जाणारी योजना आहे.

अटल पेंशन योजना

भारतातील 18 ते 40 वर्षे वयोगटातील नागरिक पात्र आहेत.निवृत्तीनंतर नियमित पेन्शन मिळते.सरकारकडून गॅरंटीड पेन्शन मिळते.

राष्ट्रीय सामाजिक सहाय्य कार्यक्रम

गरीब ज्येष्ठ नागरिकांसाठी आर्थिक सहाय्य करणारी योजना आहे सदर योजनेत ₹2000 प्रति महिना पेन्शन मिळते. वय 70 वर्षे आणि त्यापेक्षा जास्त वय असलेले नागरिक पात्र आहेत.

ज्येष्ठ नागरिकांसाठी पोर्टल : https://www.maharashtra.gov.in/Site/1567/Senior%20Citizens

ज्येष्ठ नागरिकांना आर्थिक आणि सामाजिक सुरक्षा प्रदान करतात.

This article Written by Swati Ghuge from Maharashtra.She is famous YouTuber, Website Developer and Administrator of liveupdate18.com

1 thought on “Senior citizen schemes : ज्येष्ठ नागरिकांसाठी चालवण्यात येणाऱ्या महत्त्वपूर्ण सहा योजना ! पहा त्यांचे फायदे व सविस्तर माहिती …”

  1. Revolutionize Your Farming Practices with Bwer Pipes: Discover the power of Bwer Pipes’ advanced irrigation solutions for agricultural success in Iraq. Our innovative sprinkler systems and durable pipes are engineered to optimize water usage, improve crop health, and boost yields, helping farmers thrive in challenging environments. Explore Bwer Pipes

    Reply

Leave a Comment