Close Visit Mhshetkari

SBI Pension Loan : मोठी बातमी …. आता वयाच्या 60 व्या वर्षीही मिळेल स्वस्तात कर्ज ! बघा कोणती बँक देते ?

SBI Pension Loan : नमस्कार मित्रांनो आपल्याला माहिती असेल की, नवीन कोणतेही कार्य करण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांपासून कर्मचाऱ्यांना कर्जाशिवाय पर्याय नसतो. परंतु 60 वर्षापेक्षा जास्त व्यक्तीच्या लोकांना बँका कर्ज देण्यासाठी टाळाटाळ करतात.

आता एसबीआय ही अशी बँक आहे, जी खास अटीनसह वृद्ध व्यक्तींना वैयक्तिक कर्ज देते.आज आपण त्याबद्दलच जाणून घेणार आहोत.

SBI Pension Loan offer 2024

मित्रांनो स्टेट बँक ऑफ इंडियाची ही योजना पेन्शन कर्ज म्हणून ओळखली जाते मात्र सदरील कर्ज मिळवण्यासाठी ज्येष्ठ व्यक्तींना काही अटींची पूर्तता करावी लागते.पेन्शन धारकांना देण्यात येणारे कर्ज हे एक प्रकारचे वैयक्तिक म्हणजे पर्सनल लोन असते.

जर एखाद्या ज्येष्ठ व्यक्तीला म्हणजे 60 वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक वयस्कर व्यक्तींना घर बांधायचे असेल किंवा मुलांच्या लग्नासाठी खर्च उचलावा लागत असेल, तर स्टेट बँक ऑफ इंडिया कडून पेन्शन कर्ज सुविधा उपलब्ध करून देण्यात येते, यासाठी आपल्या मिळणाऱ्या पेन्शनच्या रकमेचा विचार करण्यात येतो.

स्टेट बँक ऑफ इंडिया पेन्शन कर्ज अटी

पेन्शन लोन घ्यायचे असेल तर कर्जदाराचा पेन्शन पेमेंट स्टेट बँक ऑफ इंडियाकडे असणे आवश्यक आहे. पेन्शन कर्ज घेणारी व्यक्ती 76 वर्षापेक्षा कमी असावी.

एसबीआय कडून घेण्यात येणाऱ्या या पेन्शन कर्जांचा परतफेडचा कालावधी 72 महिन्याचा म्हणजे सहा वर्षाचा असतो, तसेच हे कर्ज तुम्हाला वयाच्या 78 वर्षापूर्वी फेडावे लागते. 

हे पण पहा --  Personal loan vs credit card : पर्सनल लोन घ्यावे की क्रेडिट कर्ज घ्यावे ? तुमच्यासाठी योग्य निवड कोणती; पहा सविस्तर ..

पेन्शन कर्ज घेणाऱ्या निवृत्ती धारकास त्याच्या जोडीदाराची किंवा कोणत्याही तृतीय पक्षाची हमी असल्यास हे कर्ज तुम्हाला दिले जाते.

पेन्शन लोन फायदे

  • पहिला फायदा म्हणजे त्याची प्रक्रिया शुल्क इतर कर्जांपेक्षा खूपच कमी आहे. 
  • सदरील कर्ज हे सुरक्षित कर्ज मानले जात असल्याने ते सहज उपलब्ध आहे.
  • पर्सनल लोन घेण्यासाठी जास्त कागदपत्रे देण्याची गरज नाही. 
  • सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पेन्शन कर्ज हे वैयक्तिक कर्जापेक्षा स्वस्त व्याज दराने मिळते.
How to Apply pension Loan

SBI च्या कोणत्याही शाखेत पेन्शन कर्जासाठी अर्ज करता येतो. संबंधित कर्जाविषयी अधिक माहिती मिळवायची असेल, तर तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अधिकृत वेबसाइट https://sbi.co.in/ वर जाऊन संपूर्ण माहिती मिळवू शकता.

स्टेट बँक ऑफ इंडियाने टोल फ्री क्रमांकही जारी केला आहे.आपण या टोल फ्री क्रमांकावर कॉल करूनही माहिती मिळवू शकता. पेन्शन कर्जाबाबत काही शंका किंवा अडचणी असेल तर आपण टोल फ्री नंबर (1800-11-2211) वर कॉल करून संबंधित संपूर्ण माहिती मिळवू शकता.

This article Written by Swati Ghuge from Maharashtra.She is famous YouTuber, Website Developer and Administrator of liveupdate18.com

Leave a Comment