Close Visit Mhshetkari

SBI Bank Offers : स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांसाठी महत्वाची बातमी; 31 मार्चपर्यंत घेऊ शकता या ऑफरचा लाभ !

SBI Bank offers : नमस्कार मित्रांनो आपल्याला माहिती असेल की आर्थिक वर्षाचा शेवटचा महिना चालू आहे यावेळी नोकरदारसह गुंतवणूकदार वेगवेगळ्या बचत योजनेचा लाभ घेण्याच्या तयारीत असतात.

31 मार्च पूर्वी आपल्याला अनेक प्रकारची आर्थिक कामे पूर्ण करावी लागत असतात तर आज आपण 31 मार्चपूर्वी एसबीआय बँक कडून देण्यात येणाऱ्या महत्त्वाच्या ऑफर्स विषयी सविस्तर माहिती पाहणार आहोत.

SBI अमृत कलश योजना

देशातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक SBI ची अमृत कलश योजना ही एक विशेष FD योजना आहे. यामध्ये गुंतवणूक करण्याची अंतिम तारीख 31 मार्च 2024 आहे. बँक त्यावर 7.10 % व्याज देते. SBI च्या या योजनेत 400 दिवसांच्या FD वर 7.10 % व्याज दिले जाते.

SBI WeCare FD scheme

SBI ने WeCare FD योजनेत गुंतवणुकीची अंतिम मुदत 31 मार्च 2024 आहे.SBI त्यांच्या WeCare FD वर ग्राहकांना चांगले व्याज देते आहे. साधारणपणे बँक कोणत्याही FD वर सामान्य ग्राहकापेक्षा ज्येष्ठ नागरिकांना 0.50 % अधिक व्याज देते.

हे पण पहा --  SBI Personal Loan मोठी बातमी...SBI ने सुरु केले कमी व्याजदरात कर्ज वाटप पहा माहिती

SBI Wecare योजनेअंतर्गत 7.50% व्याज मिळते. सदरील योजनेमध्ये गुंतवणूकदारांना कमीत कमी 5 वर्ष तर जास्तीत जास्त 10 वर्षे गुंतवणूक करावी लागते.

SBI home loan Rate

मित्रांनो एसबीआय बँकेकडून 31 मार्च 2024 पर्यंत होम लोन वरती मोठी ऑफर देण्यात येत आहे ज्याद्वारे ग्राहकांचा सिबिल स्कोर जर 750-800 पेक्षा जास्त असेल तर,त्यांना 8.60 % व्याज दराने गृहकर्ज दिले जात आहे. सध्या गृहकर्जाचे व्याजदर 9.15 % आहे.

This article Written by Swati Ghuge from Maharashtra.She is famous YouTuber, Website Developer and Administrator of liveupdate18.com

Leave a Comment