Close Visit Mhshetkari

RTE Admission Process : RTE 25% राखीव जागासाठी प्रकिया सुरू ! पहा पात्रता,कागदपत्रे आणि ऑनलाइन अर्ज प्रक्रिया विषयी सविस्तर माहिती ..

RTE Admission Process : महाराष्ट्र सरकार जानेवारी 2024 पासून आरटीई प्रवेश 2024-25 साठी अर्ज स्वीकारण्यास सुरुवात होणार आहे. RTE 25% राखीव जागांसाठी अर्ज करण्यास इच्छुक असलेले पालक ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात.ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया विषयी सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत.

RTE Admission Process 2024 – 25

मित्रांनो आपल्याला माहिती असेल की नुकतंच सरकारने आरटीई नियमांमध्ये बदल केलेला असून, आता 1 किलोमीटरच्या परिसरात जर, सरकारी जिल्हा परिषद स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळा असेल तर आर.टी.ई 25% ऍडमिशन संबंधित खाजगी शाळांना करता येणार नाही.

शाळा निवड :- सर्वप्रथम, आपल्या परिसरातील आरटीई अंतर्गत येणाऱ्या शाळांची माहिती गोळा करा.

जर सरकारी शाळा तुमच्या घरापासून लांब असल्यास, जवळच्या खासगी शाळांमध्ये आरटीईसाठी राखीव जागा उपलब्ध आहेत का ते बघा.

निवडलेल्या शाळेतून आरटीई अर्ज घ्या आणि एका मुलासाठी एकाच शाळेत अर्ज करा.

तुम्ही ऑनलाइनही फॉर्म भरू शकता आणि प्रिंट काढून आवश्यक कागदपत्रांसह शाळेत जमा करा.

RTE Online Admission Process 

  • सर्वप्रथम RTE च्या https://rte25admission.maharashtra.gov.in/adm_portal/Users/rteindex या अधिकृत वेबसाइट ला भेट द्या.
  • तुमच्या जिल्ह्या आणि ब्लॉकमधील शाळेची यादी निवडा.
  • फॉर्ममध्ये मुलाचे संपूर्ण नाव, ठिकाण, लिंग आणि इतर माहिती अचूकपणे भरा.
  • फॉर्म भरल्यानंतर सबमिट बटणावर क्लिक करा.
हे पण पहा --  RTE Admission : आरटीई प्रवेशा संदर्भात महत्त्वाची अपडेटस् ! आता या दिवशी होणार विद्यार्थी नोंदणी ..

निकाल आणि प्रवेश

खासगी शाळांमध्ये लॉटरी पद्धतीने निकाल काढला जातो.लॉटरीनंतर प्रवेश प्रक्रियेची तारीख निश्चित केली जाते आणि त्या तारखेला मुलाचा संबंधित शाळेत प्रवेश निश्चित होतो.

RTE प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रे

आधार कार्ड :- वंचित व आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील सर्व प्रवेशपात्र बालकांकरिता आवश्यक आर.टी.ई. २५ % प्रवेश प्रक्रियेवेळी विदयार्थी / पालक यांचे आधार कार्ड किंवा आधार क्रमांक मिळण्याकरिता केलेल्या अर्जाची पावती घेणे अनिवार्य करण्यात आला आहे. 

सदर बालकाच्या आधारकार्डची विहित कालावधीत पूर्तता न झाल्यास आर.टी.इ.२५ टक्के अंतर्गत प्रवेश रदद करण्यात येईल याची पालकांनी नोंद घ्यावी.

जन्मतारखेचा पुरावा :- ग्रामपंचायत नि.पा. म.न.पा. यांचा दाखला / रुग्णालयातील ANM रजिस्टर मधील दाखला / आंगणवाडी / बालवाडीतील रजिस्टर मधील दाखला / आई, वडील अथवा पालकांनी प्रतिज्ञा पत्रा‌द्वारे केलेले स्वयंनिवेदन.

रहिवासाचा / वास्तव्याचा पुरावा : – रेशनिंग कार्ड ,ड्रायव्हिंग लायसन्स, वीज टेलिफोन बिल देयक,पाणी पट्टी,प्रॉपर्टी टैक्स देयक/ घरपट्टी,फक्त राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक,आधार कार्ड,मलदान ओळखपत्र,पासपोर्ट या पैकी कोणतेही एक

This article Written by Swati Ghuge from Maharashtra.She is famous YouTuber, Website Developer and Administrator of liveupdate18.com

Leave a Comment