Close Visit Mhshetkari

RTE Admission : आरटीईच्या 25 % राखीव प्रवेशाचे अर्ज भरण्यासाठी मिळली मुदतवाढ; पहा नवीन तारीख

RTE Admission : नमस्कार मित्रांनो आरटीई अंतर्गत महाराष्ट्रात आर्थिक दुर्बल घटकांसाठी 25% राखीव जागा ठेवण्यात आलेले आहेत.शिक्षण हक्क कायदा अंतर्गत सदरील जागेसाठी ऑनलाईन अर्ज मागवण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे, परंतु आता यासाठी मदत वाढ मिळालेली आहे.

RTE Admission 2024 Date

शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेशाकरिता ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी प्राथमिक शिक्षण संचालनालयाने १० मे पर्यंत मुदतवाढ दिली आहे.राज्याचे प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी स्पष्ट केले आहे.

प्राथमिक शिक्षण विभागातर्फे ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येते. आरटीईच्या तरतुदी बदल केला असून आता २५ % राखीव जागांवरील प्रवेशासाठी सरकारी, अनुदानित शाळांमधील प्रवेशाचा पर्याय प्राधान्याने दिसणार आहे.

मित्रांनो, नवीन नियमानुसार आता बालकाच्या निवासस्थानापासून एक किलोमीटर अंतरावर शासकीय अनुदानित किंवा स्थानिक स्वराज्य शाळा नसतील आणि आणि स्वयंअर्थसहाय्यित शाळा असेल तरच अशा परिस्थितीत त्या स्वंयअर्थसहाय्यित शाळेत मुलांना २५ टक्के राखीव जागांवर प्रवेश मिळणार आहे.

हे पण पहा --  RTE Admission : आता पहिलीच्या प्रवेशासाठी लागणाऱ्या वयोमर्यादेत मोठा बदल; केंद्राचे सर्व शाळांना निर्देश 

आरटीई २५ टक्के राखीव प्रवेश

सदरील प्रवेश प्रक्रियेच्या पोर्टलवर खासगी शाळांसह सरकारी आणि अनुदानित शाळांनी नोंदणी केल्याचे दिसून येते.शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये ७६ हजार ५२ शाळांमधील ८ लाख ८६ हजार ४११ जागांकरिता मंगळवारी रात्रीपर्यंत केवळ ६२ हजार २७७ अर्ज आले आहेत.

RTE कायद्यात राज्य सरकारने बदल केल्यामुळे पालकांनी या प्रवेश प्रक्रियेअंतर्गत नोंदणीला अल्प प्रतिसाद दिसून येत आहे. परिणामी पालकांनी सदरील प्रवेश प्रक्रियेत सहभागी होऊन बालकांच्या शाळा प्रवेशासाठी अर्ज भरावेत, यासाठी शिक्षण विभागातर्फे ही मुदतवाढ देण्यात आली आहे.

Leave a Comment