Close Visit Mhshetkari

RTE Admission : आता पहिलीच्या प्रवेशासाठी लागणाऱ्या वयोमर्यादेत मोठा बदल; केंद्राचे सर्व शाळांना निर्देश 

RTE Admission : नमस्कार मित्रांनो आपल्याला माहिती असेल की नवीन शैक्षणिक धोरणानुसार शिक्षण क्षेत्रात वेगवेगळे नवीन बदल होताना दिसत आहेत.

आता केंद्रीय शिक्षण मंत्रालयाकडून इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रवेश पात्र वयाच्या संदर्भात नवीन निर्देश प्राप्त झाले आहेत. सदरील निर्णय सर्व घटक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना लागू ला राहणार आहेत तर काय आहे बद्दल पाहूया सविस्तर.

New Education Policy 2024

आपल्याला माहिती आहे की नवीन शैक्षणिक वर्ष 2024 25 लवकरच सुरू होणार असून यासाठी प्रवेश प्रक्रिया राबवली जाणार आहे त्या अनुषंगाने इयत्ता पहिली मध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची किमान वय 6 वर्ष असणे आवश्यक असणार आहे.

केंद्रीय शिक्षण मंत्रालयाकडून पाठवण्यात आलेल्या परिपत्रकात पहिलीत शिक्षण घेण्यासाठी किमान अरदा वयोमर्यादा सहा वर्षे असावी असे निर्देश दिलेले आहेत. सदरील वयोमर्यादा NEP 2020 अंतर्गत करण्यात आली आहे. या संदर्भात गेल्यावर्षी चर्चा करण्यात आली होती. त्यानंतर पुन्हा एकदा सरकारने यावल सखोल विचार करून पहिलीच्या मुलांच्या प्रवेश पत्र वया संदर्भात परिपत्रक निर्गमित केले आहे.

हे पण पहा --  Education policy : सरकारने राज्यातील शाळा संदर्भात घेतला मोठा निर्णय! आता अनुदानित व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा ..

RTE Admission 2024 – 2025

प्रत्येकाच्या मते पहिलीच्या वर्गाच्या प्रवेश घेण्यासंदर्भात वेगवेगळे नियम आहेत. काही राज्यांमध्ये पाच वर्ष मर्यादा पहिली मध्ये प्रवेश करण्यासाठी लागू आहेत मात्र असे केल्यामुळे मुलांच्या अभ्यासावर जास्त ताण येत असल्याचे दिसून आले आहे.

महाराष्ट्रात सुद्धा अनेक ग्रामीण पातळीवरील इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये पाच वर्षाखालील मुले इयत्ता पहिलीत शिक्षण घेत असल्याचे दिसून आले आहे.त्यामुळे या सर्व भावी वरती आळा घालण्यासाठी सरकारने पालकांना मुलांचे वय वर्ष 6 वर्षे झाल्यानंतरच शाळेत घालावे यासंदर्भात सूचना दिल्या आहेत.

Leave a Comment