Close Visit Mhshetkari

Retirement Plan : रिटायरमेंटनंतर कमाईचे साधन नसल्यास SBI करणार मदत ! पहा कसा घेता येईल फायदा?

Retirement Plan : देशातील बहुतेक ज्येष्ठ नागरिकांना उत्पन्नाचा स्त्रोत उपलब्ध नाही.अशावेळी बचतीची अभावी खर्च भागवणे सुद्धा अवघड होऊन बसलेले आहेत.

आता देशातील सर्वात मोठी बँक एसबीआय तर्फे ज्येष्ठ नागरिकांना विशेष योजना चालवली जात आहे. ज्याद्वारे नागरिकांना घराच्या व इतर मालमत्तेच्या बदल्यात दरवाहा ठराविक रक्कम दिली जाणार आहे.

SBI Reverse Mortgage Loan

SBI तर्फे ज्येष्ठ नागरिकांसाठी रिव्हर्स मॉर्गेज योजना चालवली जात आहे. यामध्ये ज्येष्ठ नागरिकांच्या घराच्या किंवा इतर मालमत्तेच्या बदल्यात बँकेकडून दरमहा ठराविक रक्कम दिली जाते.

सदरील योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना घराच्या किंवा मालमत्तेच्या मोबदल्यात बँकेकडून ठराविक रक्कम दिली जाते अशा ग्राहकांना दिलेली रक्कम परत केली जाणार नाही असं बँक गृहीत धरते.

मात्र,या योजनेचा लाभ घेणाऱ्या व्यक्तीला परतफेडीचा पर्याय दिला जातो.अशा ज्येष्ठ नागरिकांसाठी योग्य मानली जाते ज्यांच्याकडे उत्पन्नाचा कोणताही स्रोत नाही.

एसबीआय रिव्हर्स मॉर्गेज योजना

सदरील योजनेचा लाभ घेतल्यानंतर, मालमत्तेचे मूल्यांकन दर पाच वर्षांनी केले जाते त्यामध्ये मालमत्ता मूल्याच्या 80% पर्यंत रक्कम कर्ज म्हणून उपलब्ध करून देण्यात येते.देण्यात येणाऱ्या कर्जाच्या रकमेत व्याज देखील समाविष्ट आहे.

हे पण पहा --  SBI Bank : स्टेट बँक ऑफ इंडियाच्या कोट्यवधी क्रेडिट कार्ड ग्राहकांना झटका; 1 एप्रिलपासून लागू होणार हा नियम ..

कर्जदार ज्येष्ठ नागरिकांचा मृत्यू झाल्यास बँक मालमत्तेचे विक्री करून दिलेली रक्कम आणि आज वसूल करते आणि उरलेली रक्कम नोमिनीस किंवा वारसदाराला दिली जाते.

साधारणपणे 60 वर्षे किंवा त्याहून अधिक ज्येष्ठ नागरिकांना सदर योजनेचा लाभ घेता येतो यासाठी कर्जदार व्यक्तीचे वय 58 वर्षापेक्षा अधिक असणे गरजेचे आहे.

आपण संयुक्त खात्यातून सुद्धा कर्ज प्रकरण करू शकतो परंतु या प्रकरणात पत्नीचे वय 58 वर्षापेक्षा असणे आवश्यक आहे.

एसबीआय रिव्हर्स मॉर्गेज योजनेंतर्गत, किमान ३ लाख रुपये आणि कमाल १ कोटी रुपये कर्ज घेता उपलब्ध करून देण्यात येते बँकेकडून दहा ते पंधरा वर्षाचा कालावधी यासाठी देण्यात येतो.

This article Written by Swati Ghuge from Maharashtra.She is famous YouTuber, Website Developer and Administrator of liveupdate18.com

Leave a Comment