Close Visit Mhshetkari

Property Gift Deed : दान केलेली वस्तू किंवा मालमत्ता परत घेऊ शकतो का ? जाणून घ्या प्रॉपर्टी गिफ्ट करण्याचे नियम … 

Property Gift Deed : भारतीय संस्कृतीत दान किंवा भेट द्यायला खूप महत्त्व आहे.लग्न असो किंवा जन्म किंवा सणोत्सव नातेवाईक भेटवस्तू देतात.प्रियजनांना भेटवस्तू देण्याप्रमाणेच आपण आपल्या जवळच्या व्यक्ती किंवा खास व्यक्तीला मालमत्ता भेट म्हणजे गिफ्ट घेऊ शकता.मालमत्ता गिफ्ट देणे म्हणजे स्वतःच्या इच्छेने मालमत्ता दुसऱ्या व्यक्तीला हस्तांतरित करत असून त्यासाठी कोणतीही किंमत घेत नाही.

Property Gift Deed Rules

मित्रांनो, आपण दान केलेली वस्तू किंवा मालमत्ता काही कारणांनी आपल्याला परत मिळवायचे असेल तर कोणता पर्याय उपलब्ध आहेत ? याविषयी आपण माहिती पाहणार आहोत.मालमत्ता भेट देण्याबाबत कायदा काय सांगतो,जाणून घेऊया…

मालमत्ता भेट देणे म्हणजे मालक स्वतःच्या इच्छेनुसार त्याची मालमत्ता दुसऱ्या व्यक्तीला हस्तांतरित करणे आणि या बदल्यात एक रुपया पैसाही घेत नसणे. सर्वप्रथम मित्रांनो,मालमत्ता हस्तांतरण कायदा, १८८२ च्या कलम १२२ नुसार मालमत्ता भेट देण्यासाठी एखाद्या व्यक्तीला योग्य गिफ्ट डीड तयार करावा लागतो. 

मालमत्ता भेट करण्याबाबत अनेक नियम आहेत.मालमत्तेची नोंदणी किंवा मालकी हक्क असलेली मालमत्ताच आपण दुसऱ्या व्यक्तीला भेट म्हणून देऊ शकतो.

दान मालमत्ता रद्द करण्याचे नियम आणि अटी

१) कायदेशीररित्या भेट देणाऱ्याने आपली मालमत्ता स्वेच्छेने दुसऱ्या व्यक्तीला त्याच्या गिफ्ट केली आणि दुसऱ्या व्यक्तीने ती स्वीकारली असेल तर,भेट किंवा गिफ्ट म्हणून दिलेली मालमत्ता परत केली जाऊ शकत नाही.

हे पण पहा --  land record : आपल्या जमिनीवर मालकी हक्क सिद्ध करणारे हे 8 पुरावे माहीत आहेत का ? पहा यादी

२) एखाद्या मालमत्तेची मालकी नवीन मालकाच्या नावावर हस्तांतरित झाली की, सामान्य परिस्थितीत हा व्यवहार रद्द करता येत नाही.

कायद्याच्या कलम १२६ मध्ये नमूद काही विशेष परिस्थितीत गिफ्ट डीड रद्द केली जाऊ शकते. 

  • उदाहरणार्थ,ज्या उद्देशासाठी मालमत्ता दान केलेली आहे,तो उद्देश पूर्ण झाला नाही, तर तुम्ही भेट म्हणून दिलेली मालमत्ता परत घेऊ शकता. 
  • गिफ्ट देणारा आणि घेणारा दोघेही सहमत असल्यास दान पत्र परस्पर संमतीने स्थगित किंवा रद्द केले जाऊ शकते.
  • दान पत्र करारावर स्वाक्षरी करूनही मालमत्तेचे हस्तांतरण झाले नसेल आणि दान देणाऱ्याने आपला निर्णय बदलला तर अशा परिस्थितीतही दान पत्र मालकाच्या इच्छेनुसार रद्द केले जाऊ शकते.
  • मालमत्ता गिफ्ट देणारी व्यक्ती मानसिकदृष्ट्या अस्थिर असेल किंवा गिफ्ट प्राप्तकर्त्याने जबरदस्ती किंवा कोणतीही फसवणूक करून दान मिळवली असेल, तर ते कृत्य अवैध घोषित केले जाऊ शकते.

This article Written by Swati Ghuge from Maharashtra.She is famous YouTuber, Website Developer and Administrator of liveupdate18.com

Leave a Comment