Close Visit Mhshetkari

Proparty Registry : मुलाला वडिलांकडून प्रॉपर्टी हस्तांतरणावर किती मुद्रांक शुल्क आकारले जाते ? पहा सविस्तर माहिती .

Proparty Registry : तुम्हाला माहिती नसेल की वडिलांना त्यांची मालमत्ता मुलाच्या नावावर करायची असेल तर त्यासाठी मुद्रांक शुल्क आकारले जाते त्यानंतर ती मालमत्ता मुलाच्या ताब्यात जाते. पण वडिलांकडून मुलाकडे मालमत्ता तर करत असताना किती शुल्क आकारले जाते याची माहिती बहुतांश जणांना माहित नसते.

त्यासाठी याविषयीची माहिती तुम्हाला या लेखांमध्ये मिळणार आहे ज्याद्वारे मालमत्त हस्तंतर करत असताना किती शुल्क मोजावे लागते व मुद्रांक शुल्क म्हणजे काय याविषयी आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत.

मुद्रांक शुल्क म्हणजे काय?

मुद्रांक शुल्क म्हणजे हा एक प्रकारचा सरकारी कर आहे. जो जो राज्य सरकार जमिनीच्या नोंदणीच्या वेळी वसूल करत असते. मुद्रांक शुल्क जमीन किंवा मालमत्तेच्या बाजार मूल्याच्या आधारे घेतले जाते. म्हणजेच मालमत्तेच्या 5 ते 7 टक्के मुद्रांक शुल्क आकारले जाते. म्हणजे सरकारी दोर आणि नोंदणी शुल्क मालमत्तेच्या बाजार मूल्याच्या 1 % टक्के असते.

मुद्रांक शुल्क देखील एक कागदपत्र आहे. त्या मालमत्तेबाबत काही वाद किंवा समस्या असल्यास त्याची कागदपत्रे न्यायालयात सादर करून कायदेशीर न्याय मिळू शकतो.

हे पण पहा --  Land Registry : आता आपल्या मोबाईलवर ऑनलाइन पहा जमिनीची रजिस्ट्री आणि इतर कागदपत्रे ! एका क्लिकवर होणार डाऊनलोड ..

मालमत्तेच्या हस्तांतरणावर मुद्रांक शुल्क किती आहे ?

मित्रांनो भारतामध्ये मुलाला वडिलांकडून मालमत्ता ज्यावेळी हस्तांतरित केली जाते मुद्रांक शुल्काचे दर राज्य सरकार ठरवत असते मालमत्तेच्या किंमतीनुसार 5.7% मुद्रांक शुल्क आहे. आणि नोंदणी शुल्क मालमत्तेच्या मूल्यावर आधारित 1% आहे.

महाराष्ट्रामध्ये कृषी मालमत्ता रक्ताचे नातेवाईक म्हणजे पत्नी पत्ती मुलगा मुलगी नातू नात त्यामध्ये आपापसात हस्तांतरित करत असताना तुम्हाला मुद्रांक शुल्क भरावे लागत नसते अशा व्यवहारासाठी आता फक्त दोनशे रुपये इतके नाम मात्र शुल्क आकारले जात आहे.

 खालील गोष्टी लक्षात ठेवा..

  1.  कागदपत्रे काळजीपूर्वक तयार करा 
  2. नोंदणीचा कालावधी संपल्यानंतर दस्तऐवजाची नोंदणी करणे कठीण होते.
  3. मालमत्तेवर कर्ज असल्यास ते फेडण्याची खात्री करा.
  4. हस्तांतरित केल्यानंतर कागदपत्र काळजीपूर्वक ठेवा.

This article Written by Swati Ghuge from Maharashtra.She is famous YouTuber, Website Developer and Administrator of liveupdate18.com

1 thought on “Proparty Registry : मुलाला वडिलांकडून प्रॉपर्टी हस्तांतरणावर किती मुद्रांक शुल्क आकारले जाते ? पहा सविस्तर माहिती .”

Leave a Comment