Phone Pe Google Pay : नमस्कार मित्रांनो अतिशय महत्त्वपूर्ण बातमी समोर आलेली आहे. आपल्याला माहितीच आहे आजकाल ऑनलाइन पेमेंट करण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे युनिफाईड पेमेंट इंटरफेस म्हणजेच यूपीआय आल्यानंतर तुम्हाला खिशामध्ये पैसे घेऊन फिरण्याची गरज नाही.
गुगल पे व फोन पे मुळे कुठूनही कधीही पैसे भरणे शक्य होते. मोठे मोठे बँकिंग व्यवहार तसेच मॉल पासून ते भाजीपाला विकणाऱ्या पर्यंत सगळीकडे आता ऑनलाईन पेमेंट आपण करू शकतो.
Googal Pe Phone Pay update
मित्रांनो तुम्हाला माहितीच आहे की ऑनलाईन सुविधा जशी वाढली आहे. परंतु फसवणुकीचे प्रमाण देखील वाढले आहे. तुम्हाला तुमची लहानात लहान चूक देखील महागात पडू शकते.ज्या चुकीमुळे तुमचे बँक अकाउंट खाली होऊ शकते .
जर तुम्ही उपाय पेमेंट गुगल पे व फोन पे वापरत असाल तर तुम्हाला तुमचा यूपीआय पिन काळजीपूर्वक वापरणे आवश्यक आहे. तुमचा पासवर्ड चोरी होऊ शकतो. तुम्हाला जर तो चोरी होऊ नये,असे वाटत असेल तर एकाच पिनचा दीर्घकाळ वापर करणे, तुम्ही जर एकाच पिनचा दीर्घकाळ वापर करत असाल तर तो चोरी होण्याचा दाट शक्यता आहे.
तुम्हाला तुमचा गुगल पे व फोन पे पिन कसा बदलायचा आहे हे आपण सविस्तर माहिती या लेखामध्ये पाहू
अशा प्रकारे बदला Google Pay पिन
- सगळ्यात अगोदर गुगल अॅप ओपन करा.
- नंतर तुमच्या प्रोफाईल पिक्चरवर क्लिक करा.
- आता बँक अकाऊंटवर टॅप करा. जर एकापेक्षा अधिक बँक अकाऊंट यूपीआय पेमेंटसाठी लिंक आहे तर कोणत्यातरी एका बँक अकाऊंटला निवडा.
- तुम्हाला एक नवे पेज ओपन होईल. येथे वरच्या उजव्या कोपऱ्यात तीन डॉट दिसतील. यावर क्लिक करायचे आहे.
- आता ‘Change UPI PIN’ चा पर्याय दिसेल.
- आता तुमचा सध्याचा पिन टाका.
- त्यानंतर तुम्हाला नवा पिन टाकण्याचा पर्याय दिसेल. नवा पिन टाका
- यानंतर नवा पिन पुन्हा टाकून दुसऱ्यांदा कन्फर्म करा.
- अशाप्रकारे तुमचा पिन पासवर्ड बदलेल.
How to Change Phone Pe Pin
- सर्वप्रथम तुम्हाला Phone pay अॅप उघडायचे आहे
- फोन पे अॅपच्या होम स्क्रीनवर प्रोफाईल पिक्चर क्लिक करा.
- Payment Methods sectionच्या उजव्या बाजूला स्क्रोल करा.
- नंतर तुम्हाला तुमचे बँक अकाऊंटला सिलेक्ट करून ज्याचा यूपीआय पिन रिसेट करायचा आहे.
- Reset UPI PIN पर्यायवर क्लिक करायचे आहे.
- निवडलेल्या बँक अकाऊंटवरून लिक आपल्या डेबिट/एटीएम कार्डचे डिटेल्स भरा.
- कार्ड डिटेल्स भरल्यानंतर तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर एसएमएसवरून ओटीपी पाठवला जातो.
- मोबाईलवर हा ओटीपी कन्फर्म करायचा आहे.
- तुमच्या डेबिट अथवा एटीएम कार्डशी लिंक ४ अंकांचा एटीएम पिन टाका. अशाप्रकारे फोन पे पिन तुमचा बदलून घ्या.