PF Balance Check : नमस्कार मित्रांनो आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आलेली असून तुम्ही जर कर्मचारी असाल व तुमचेही पीएफ खाते आहे.
दर महिन्याला आपल्या पगाराचा काही भाग पीएफ खात्यात जमा होत असतो, जो तुम्ही तुमच्या गरजेनुसार वापरू शकता व तुमच्या खात्यामध्ये किती पैसे जमा झाले आहे. ते तुम्ही घरबसल्या देखील पाहू शकता ते कसे घ्या जाणून सविस्तर.
अशी एक तुमच्यासाठी चांगल्या प्रकारची बचत योजना आहे कर्मचारी आणि नियुक्त दोघेही पीएफ मध्ये ठराविक रक्कम योगदान देतात. कर्मचाऱ्यांच्या मूळ पगाराच्या आणि महागाई भत्ता 12 % रक्कम जमा केली जाते.
पीएफचे मुख्य उद्दिष्ट काय आहे?
पीएफ खात्याचा मुख्य उद्देश म्हणजे कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर आर्थिकदृष्ट्या सुरक्षा प्रधान करून देणे व खात्यात जमा केलेल्या रकमेवर व्याज देखील देणे. तुम्हाला तुमच्या गरजेनुसार तुमच्या पीएफ खात्यातील पैसे काढता देखील येतात.पीएफ खात्यातील पैसे काढण्यासाठी कर्मचारी ऑनलाईन व ऑफलाईन अर्ज करू शकतात
PF चे फायदे काय आहे ?
- पीएफमधून पैसे काढण्यासाठी कर्मचाऱ्यांनाही कमी व्याजदरात कर्ज मिळू शकते.
- पीएफ कर्मचाऱ्यांसाठी एक अत्यंत चांगली बचत योजना आहे.
- जी कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर आर्थिक सुरक्षा मिळवून देण्यास मदत करते.
- जमा केलेल्या रकमेवर तुम्हाला व्याज मिळते आणि यामुळे निवृत्तीनंतर याचा तुम्हाला नक्कीच फायदा होतो.
पीएफ खात्यातील शिल्लक कशी तपासायची ?
तुम्हाला जर तुमच्या पीएफ मधील रक्कम तपासायची असेल तर तुम्हाला तुमच्या मोबाईल क्रमांकावरून 7738299899 या नंबर वर एसएमएस पाठवावा लागेल आणि EPFOHO UAN” टाइप करावा लागेल.
मेसेज पाठवल्यानंतर तुम्हाला तुमच्या बैलेंस सोबत एक एसएमएस मिळेल तसेच तुमचा मोबाईल नंबर तुमच्या पीएफ खात्यात जोडलेला असणे हे देखील आवश्यक आहे
कॉल करून शिल्लक तपासा
कॉलद्वारे शिल्लक तपासण्यासाठी, तुम्हाला तुमच्या पीएफ खात्यामध्ये नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावरून 9966044425 या क्रमांकावर मिस कॉल द्यावा लागेल. मिस्ड कॉल केल्यानंतर तुमच्या मोबाइलवर एक मेसेज येईल, या मेसेजमध्ये तुम्हाला पीएफची माहिती मिळेल.