PF Account Balance : नमस्कार मित्रांनो आपल्यासाठी ही एक महत्त्वाची बातमी असणार आहे. Provident Fund कोणत्याही प्रकारच्या नोकरदार वर्गासाठी हा एक महत्त्वाचा भाग आहे. कारण आपल्याला माहितीच आहे. की पीएफ ही एक प्रकारचा निवृत्तीनंतर मिळणारी गुंतवणूक आहे.
आपल्याला ज्यावेळेस गरज पडते त्यावेळेस आपण पीएफ मधील पैसे काढू शकतो तुमच्या जर पीएफमध्ये दर महिन्याला पैसे कट होत असतील तुम्ही तर तुम्ही ते वेळेवर तुमचा पीएफ बैलेंस तुम्ही चेक करायला पाहिजे . मग पीएफ बैलेंस कसा चेक करायचा याविषयी आपण माहिती याविषयी या लेखां मध्ये पाहणार आहोत.
PF balance check number
पीएफ अकाउंट बॅलन्स पाहण्यासाठी अजून एक सोपी पद्धत आहे तुम्हाला 7738299899 या क्रमांकावर SMS पाठवून रक्कम पाहू शकता.येथे तुम्ही UAN आणि Bank Account नंबरमधील शेवटचे चार आकडे माहिती द्यावी लागेल.तसेच आपण 9966044425 या क्रमांकावर मिस कॉल देऊन बॅलन्स चेक करू शकता.पण, तुम्हाला त्याआधी तुमचा मोबाईल नंबर पीएफ खात्याशी लिंक करणे आवश्यक असेल
PF Mobile aap
मित्रांनो तुम्हाला ईपीएफओ च्या ॲपवरून देखील पीएफ खात्यातील रक्कम पाहता येईल यासाठी तुम्हाला EPFO वरती नो ंद करून तुमचा UAN नंबर लिंक करणे आवश्यक असेल पीएफ रक्कम पाण्याकरता सध्याच्या परिस्थितीमध्ये सर्वाधिक वापरली जाणारी ही पद्धत असून व चांगली आहे.
आपण पीएफ बॅलेन्स चेक करण्याचा दोन पद्धती पाहिल्या असून अजून एक तिसरी पद्धत खालील प्रमाणे पाहणार आहोत.
Pf online balance check
आपल्याला पीएफ चा बॅलन्स बघ या पद्धतीने बघता येईलच पण जर तुम्हाला पीएफ मध्ये कधी पैसे जमा केले आहेत कधी काढले आहेत किती पैसे जमा केले व किती काढले गेले तसेच इतर किती इंटरेस्ट दिला गेला हे सर्व जर चेक करायचे असेल तर पीएफ चे पूर्ण स्टेटमेंट किंवा पासबुक चेक करायचे असेल तर तुम्हाला याद्वारे सर्व माहिती मिळणार आहे.
पीएफ अकाउंट बॅलन्स अशा पद्धतीने चेक करा
- तुम्हाला सर्वात पहिले epfo ची वेबसाईट ओपन करायची आहे. त्यानंतर उजव्या बाजूला तुम्हाला काही आयकॉन दिसतील त्यातील उमंग आयकॉन वर क्लिक करायचे आहे.उजव्या बाजूला दिलेल्या ऑप्शन मधून e- passbook या ऑप्शन मध्ये जायचे आहे
- या नंतर उमंग ची वेबसाईट ओपन होऊन जाईल. जर तुम्ही आधीच उमंग वर रेजिस्टर असाल तर तुमचा मोबाईल नंबर व ओटीपी च्या सहाय्याने लॉग इन करायचे आहे. आणि जर तुम्ही उमंग वर रेजिस्टर नसाल तर तुमचा मोबाईल नंबर टाकून आलेल्या ओटिपी द्वारे रेजिस्टर व्हायचे आहे व लॉग इन करायचे आहे.
- त्यानंतर नेक्स्ट पेज वर सर्च ऑप्शन मध्ये तुम्हाला epfo टाइप करून epfo department ला निवडावे.
- तुम्हाला खाली काही ऑप्शन दिसतील त्याआधी तुम्हाला पीएफ अकाउंट वर लॉग इन करायचे आहे. त्यासाठी तुम्हाला login बटन वर क्लिक करायचे आहे. व नंतर तुमचा UAN नंबर टाकून get OTP वर क्लिक करायचे आहे व तुमच्या रेजिस्टर मोबाईल नंबर वर पाठवलेला ओटीपी दिलेल्या जागी टाकून Submit बटन वर क्लिक करायचे आहे. व तुमचे पीएफ अकाउंट वर लॉग इन होईल.
- आता तुम्ही खाली दिलेल्या ऑप्शन पैकी View Passbook या ऑप्शन वर क्लिक करायचे आहे. नंतर तुमच्या employer (कंपनी) ला सिलेक्ट करायचे आहे. व लगेच तुमच्या समोर तुमचे पीएफ पासबुक ओपन होईल. व तुम्ही तुमचे पीएफ बॅलन्स स्टेटमेंट बघू शकता. मित्रांनो, इथे तुम्ही पूर्ण स्टेटमेंट PDF मध्ये डाउनलोड करू शकता.
मित्रांनो, अश्या प्रकारे आज आपण पीएफ बॅलन्स चेक कसा करायचा या बद्दल सविस्तर पणे जाणून घेतले. आशा करतो या माहितीचा तुम्हाला नक्कीच उपयोग होईल. मला जरा आमची माहिती आवडली असेल तर तुम्ही नक्की शेअर करा.
PF रक्कम येथे चेक करा – https://www.epfindia.gov.in/site_en/epassbook.php
Binisha Marchinko