Close Visit Mhshetkari

Personal Loan : पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचा पगार किती पाहिजे? पर्सनल लोन घेण्याअगोदर ह्या गोष्टी लक्षात घेणे आवश्यक आहे ?

Personal Loan : नमस्कार मित्रांनो आपण आज आपल्या आर्थिक समस्यां कशा प्रकारे सोडवायच्या या  विषयी माहिती पाहणार आहोत. प्रत्येकाला जीवन जगत असताना आर्थिक गरज निर्माण होत असते.

कधी शिक्षणासाठी तर कधी आजारपणासाठी अशा वेळेस घरामध्ये लग्न समारंभ सारखे खर्चिक कार्यक्रम होतात. अशा वेळेस या गरजा पूर्ण करण्यासाठी पैसा कुठून वेळेवर आणायचा व आपल्या बँक खाते पाहिजे. तेवढा पैसा नसल्याने वित्तीय संस्थांच्या माध्यमातून आपण वैयक्तिक कर्ज घेऊ शकतो.

तुम्ही पर्सनल लोणच्या आधारे कर्ज घेऊ शकता.आणि हल्लीच्या काळामध्ये कर्ज मिळवण्याची प्रक्रिया सोपी झालेली आहे अगदी कमी कागदपत्र जोडून तुम्ही पर्सनल लोन मिळू शकता.

पर्सनल लोन घेण्यासाठी किती पगार पाहिजे?

नोकरदार व्यक्तींना पर्सनल लोन ही ताबडतोब दिले जाते प्रश्न एक असुरक्षित लोन असल्यामुळे कुठल्याही प्रकारची मालमत्ता गहाण ठेवण्याची काहीही गरज नसते परंतु जी व्यक्ती ही लोन घेते त्या व्यक्तीकडे आर्थिक उत्पन्न स्त्रोत असणे आवश्यक आहे

ज्या व्यक्तीला कमीत कमी 35 हजार पगार आहे त्या व्यक्तीला पर्सनल लोन मिळू शकते निवृत्त झालेल्या व्यक्तीला  पर्सनल लोन मिळणे अशक्य राहते. त्या व्यक्तीला लोन देण्याआधी बँकेला विचारच करावा लागतो

हे पण पहा --  SIP Smart Tips : आता कमी गुंतवणुकीवरही मिळवता येतो सर्वाधिक रिटर्न्स ! पहा SIP करणाऱ्यांसाठी 10 स्मार्ट टिप्स ..

 परंतु असे कर्ज घेत असताना तुम्हाला काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे. मग कुठल्या गोष्टीची काळजी घेणे आवश्यक आहे ते आपण पाहणार आहोत.

पर्सनल लोन घेताना या गोष्टी लक्षात घेणे आवश्यक आहे

1- लोन घेण्या अगोदर तुम्हाला किती कर्ज हवय याचा विचार करणे गरजेचे आहे

2 गरजेपेक्षा जास्त लोन घेणे हे चुकीचे ठरू शकते

3- तुम्ही वैयक्तिक कर्ज घेण्याअगोदर ते किती कालावधीसाठी घेत आहे हे लक्षात घेणे आवश्यक आहे

4 पर्सनल लोनचा परतफेडीचा कालावधी 12 ते 60 महिने असतो. आणि तुम्हाला जर कर्जाचा हप्ता जास्त ठेवायचा असेल तर तुम्ही कालावधी वाढून घेऊ शकता

5 तुम्ही ज्या बँकेत पर्सनल लोन करता अर्ज करता आहात त्या वेळी स्वतःचा सिबिल स्कोर चेक करणे गरजेचे आहे. तुमचा सिबिल स्कोर 800 असेल तर तुम्हाला प्रसनल लोन मिळणे शक्य आहे

6 तुम्ही पर्सनल लोन करण्याअगोदर त्यासाठी कोणते कागदपत्रे लागतात याची माहिती करून घेणे आवश्यक आहे .आधार कार्ड तसेच पासपोर्ट, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, मतदान कार्ड तसेच आयडी प्रूफ सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आयटीआर रिटर्न डिक्लेरेशन इत्यादी कागदपत्रे लागतात.

Leave a Comment