PCMC Bharti 2024 : नमस्कार मित्रांनो, आपण जर नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये विविध 65 रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये भरती करिता पात्र तसेच इच्छुक उमेदवारांकडून ऑफलाईन प्रकारे अर्ज मागविले जात आहेत.सदरील भरतीची अधिकृत जाहिरात पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अधिकृत वेबसाईटवर प्रकाशित करण्यात आली आहे.
जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे अर्ज करण्याची तसेच मुलाखतीला हजर राहण्यासाठी प्रत्येक आठवड्याच्या दर बुधवारी सकाळी हजर राहायचे आहे.
PCMC Bharti 2024 Apply Online
PCMC Bharti 2024
एकूण जागा: 65
पदाचे नाव: विशेषतज्ञ पद
पदसंख्या:
फिजिशियन – 9
प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ञ – 9
बालरोग तज्ञ – 9
नेत्ररोग तज्ञ – 9
त्वचारोग तज्ञ – 9
मानसोपचार तज्ञ – 10
ENT तज्ञ – 10
वयोमर्यादा: 70 वर्षापर्यंत
अर्ज करण्याची पद्धत: ऑफलाइन
अर्ज फी: नाही
मासिक वेतन: 60,000 रुपये
मुलाखतीसाठी हजर राहण्याचा पत्ता : पिंपरी चिंचवड महानगरपालिका बिल्डिंग, वैद्यकीय विभाग, दुसरा मजला, पिंपरी – 411 018
नोकरीचे ठिकाण: पिंपरी चिंचवड
अर्जप्रक्रिया:
तुम्हाला ही भरतीसाठी अर्ज करायचा असल्यास तुम्ही खालीलप्रमाणे अर्ज करू शकता:
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अधिकृत वेबसाईटवर जा.
“Careers” या टॅबवर क्लिक करा.
“Recruitment” या टॅबवर क्लिक करा.
“PCMC Bharti 2024” या लिंकवर क्लिक करा.
या पृष्ठावर तुम्हाला अर्ज फॉर्म दिसेल.
अर्ज फॉर्म भरून आवश्यक कागदपत्रांसह पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वैद्यकीय विभागाकडे जमा करावे.अर्ज केलेल्या उमेदवारांनी प्रत्येक आठवड्याच्या दर बुधवारी सकाळी 11 वाजता वर दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर राहावे.
भरती संबंधित अटी आणि शर्ती:
ही सर्व पदे कंत्राटी स्वरूपाची असल्याने नियुक्ती ही 11 महिने 29 दिवसांसाठी असेल.
या पदावर कायमचा हक्क राहणार नाही.
अर्जदाराच्या विरुद्ध कोणत्याही प्रकारचा फौजदारी गुन्हा दाखल नसावा.