Close Visit Mhshetkari

Mobile Charger : खरंच दुसऱ्या चार्जरने मोबाईल चार्ज केल्यास बॅटरीचे आयुष्य कमी होते का ? पहा सविस्तर…

Mobile Charger : नमस्कार मित्रांनो आजकाल सर्वच जण आयफोन किंवा अँड्रॉइड फोन वापरत आहेत. पण प्रत्येक वेळेस आपण आपला मोबाईल चार्ज करण्यासाठी चार्जर सोबत घेऊन जात नसतो. अनेक वेळा आपण एकमेकांचा चार्जर सहज वापरतो.मात्र त्यामुळे तुमच्या बॅटरीचे स्वास्त्यावर काय परिणाम होतो हे युजरच्या लक्षात येत नाही तर काय होतो परिणाम पाहूया सविस्तर

Mobile Charger Use Tips 

मोबाईलच्या अतिवापरामुळे किंवा एखाद्या वेळेस घाई गडबडीत सकाळी मोबाईल चार्जिंग न करता आपण बाहेर पडतो.अशा वेळेस मोबाईल फोनची बॅटरी कमी होते,आपण लगेच उपलब्ध असलेल्या दुसऱ्या कंपनीचा चार्जर वापरून आपला मोबाईल चार्ज करतो. पण असे असले तरी हे कितपत योग्य आहे.याचा विचार तुम्ही केला आहे का? मित्रांनो आपल्याला नेहमी सांगितल्या जाते की दुसऱ्या मोबाईलचा चार्जर आपल्या फोन चार्ज करण्यासाठी वापरू नका ते किती खरं आहे तज्ञ काय सांगतात जाणून घेऊया.

हे पण पहा --  solar power charger : आता करा सोलर चार्जरने करा मोबाईल चार्ज ! किमंत फक्त....

प्रत्येक मोबाईल किंवा फोन कंपनीने मोबाईलच्या चार्जर संदर्भात वेगवेगळी डिझाईन किंवा क्षमता निश्चित केलेली असते थोडक्यात प्रत्येक फोनसाठी वेगळा व्हॅटचा चार्जर वापरला जातो.फोनसाठी योग्य आकार, योग्य व्होल्टेज आणि योग्य प्रकारच्या कनेक्टरही दिलेल्या असतात.

आपण वापरत असलेल्या दुसऱ्या चार्जरचा व्होल्टेज खूप जास्त असं असेल तर बॅटरी खराब होऊ शकते. तसेच चार्जरचा होल्टेज कमी असल्यास मोबाईल चार्ज होण्यासाठी खूप मोठा वेळ लागू शकतो यामुळे बॅटरीच्या आयुष्यावर मोठा परिणाम होऊ शकतो.चुकीच्या व्होल्टेजसह चार्जर वापरल्याने तुमच्या फोनची बॅटरी जास्त गरम होऊन स्फोट होण्याची फोन हिट होण्याची शक्यता असते. बॅटरी लवकर उतरायला लागते.

थोडक्यात तज्ञाकडून असा सल्ला दिला जातो की आपल्या मोबाईल सोबत आलेले चार्जरच नेहमी वापरावे किंवा मॅन्युफॅक्चर करून नवीन चार्जर खरेदी करावे. मोबाईल बॅटरीच्या आयुष्याबरोबरच आपल्या घरातील सदस्यांच्या सुरक्षेसाठी सुद्धा ही सवय लावणे आवश्यक आहे.

Leave a Comment