Loan Foreclosure : नमस्कार मित्रांनो आपल्याला माहिती असेल की आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्याला आर्थिक अडचणीत बँकेच्या माध्यमातून मदत मिळत असते. ग्राहकांच्या वेगवेगळ्या करता लक्षात घेऊन बँका वेगवेगळ्या प्रकारची लोन देत असते.एखाद्या व्यक्तीला आपल्या वैयक्तिक गरजा पूर्ण करण्यासाठी तातडीने जरी लोन घ्यायचे असेल तरीही आता ते शक्य आहे.
मित्रांनो आपल्याला माहीत असेल की आपण घेतलेल्या कर्जाची आपल्याला नियमितपणे परतफेड करावे लागत असते त्यासाठी आपण वेळोवेळी हप्ते भरत असतो.घर आणि गाडीवरील लोन हे दीर्घ कालावधीतील असतात.
What is Loan Foreclosure
सर्वसाधारणपणे होमलोनचा कालावधी किमान १५ ते २० वर्षांचा असतो. थोडक्यात कर्जदाराला प्रत्येक महिन्याच्या ठराविक तारखेला निश्चित ईएमआय भरावा लागतो,असे असले तरी बहुतांश कर्जदार मुदतीपूर्वी लोन क्लिअर करण्याचा मार्ग पत्करतात.
परंतु अशावेळी बँक आपल्याकडून लोन क्लोज करण्या संदर्भासाठी काही शुल्क आकारतात त्याला लोन फॉर्म क्लोजर शुल्क असे म्हणतात अनेक लोकांना लोन क्लोजर बद्दल माहिती नसते आज आपण याविषयी सविस्तर माहिती पाहणार आहोत.
‘लोन फोरक्लोजर’ म्हणजे काय?
अनेक वेळा मोठे कर्ज फेडताना मोठी आर्थिक ओढाताण होते त्यामुळे दीर्घकालीन कर्जा संदर्भात कर्जदार परतफेडच्या कालावधी पूर्वीच किंवा मुदतपूर्व कर्ज बंद करून कर्ज खाते बंद करतात यावर आकारल्या जाणाऱ्या शुल्कास ‘लोन फोरक्लोजर’ असे म्हटले जाते.
याबाबतीत वेगवेगळ्या बँकांचे वेगवेगळे नियम आहेत तर सर्वसाधारण कोणकोणते नियम असतात हे आपण आता बघणार आहोत.
लोन फोरक्लोजर शुल्क कधी भरावे लागते?
वैयक्तिक कर्ज शैक्षणिक कर्ज किंवा व्यवसाय कर्ज वाहन कर्ज यासारख्या कर्ज प्रकारात लोन फोरक्लोजरचा (Loan Foreclosure) पर्याय असतो. मात्र, यात प्रत्येक कर्जदाराला फोरक्लोजर शुल्क भरावे लागत नाहीत. या संबंधित RBI चा एक नियम आहे.
आपण जर कर्ज घेते वेळेस प्रोटीन व्याजदर पर्याय निवडला असेल तर आरबीआयकडून व्याजदरात जसा बदल होईल तसा तुमच्या लोन वरील व्याजारात बदल होतो. अशावेळी आपण आपली कर्ज जर क्लोज करायची ठरले तर कोणत्याही प्रकारची शुल्क आपल्याला लागू पडत नाही.फिक्स व्याजदरावर कर्ज घेतले असेल आणि मुदतीपुर्वी अकाउंट क्लोज करायचे असल्यास फोरक्लोजर शुल्क द्यावा लागतो.
Bank Loan Foreclosure rules
मित्रांनो प्रत्येक बँकेचे क्लोजर चार्जेस वेगवेगळे असू शकतात. कर्जदाराने मुदतीआधी घेतलेल्या कर्जाची पूर्ण परतफेड केली तर त्याच्यावर असलेली कर्जाची जबाबदारी हटल्यामुळे बँकांचे मोठे नुकसान होते. परिणामी बँका कर्जदाराकडून कर्ज बंद करण्या अगोदर शुल्का करतात यामध्ये आपल्या शिल्लक रकमेच्या पाच टक्के रक्कम साकारले जाऊ शकते या संदर्भात सविस्तर माहिती कर्ज घेते वेळेस बँकांच्या अर्जामध्ये दिलेली असते.त्यामुळे कर्ज घेताना फोर क्लोजरच्या अटींची माहिती करून घ्यावी.