Kunbi Caste Certificate : नमस्कार मित्रांनो आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली असून राज्य सरकारने नवीन निर्णय घेतला आहे त्यानुसार एखाद्या व्यक्तीकडे कुणबी नोंदी सापडल्या असतील तर त्याच्या सर्व नातेवाईकांना देखील कुणबी प्रमाणपत्र मिळणार आहे.
मनोज जरांगे यांच्या जोरदार संघर्षानंतर हा निर्णय घेण्यात आला मराठा ओबीसी सगें सोयरे शासन निर्णय जारी करण्यात आला असून. मराठा आरक्षण बाबत मनोज जरांगे यांनी मोठ्या प्रमाणावर लढा दिला यातूनच शासनाने सगे सोयरे हा शासन निर्णय अंमलात आणला.
या पार्श्वभूमीवर आपण कुणबी कास्ट सर्टिफिकेट कसे काढावे त्यासाठी कोणते आवश्यक कागदपत्र असणार अर्ज प्रक्रिया कशी असेल याविषयी सविस्तर माहिती आपण या लेखांमध्ये पाहणार आहोत
Kunbi Caste Certificate Apply Online
तुम्हाला सांगायची झाल्यास कुणबी ही जात मुळात ओबीसी प्रवर्गामध्ये येते कुणी म्हणजे जे लोक शेती करतात आणि जे सर्वस्वी शेतीवर अवलंबून आहेत यालाच कुणबी असे म्हणतात.
सध्याच्या परिस्थितीमध्ये मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी बलाढ्य संघर्ष सुरू आहे. म्हणून मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देऊन त्यांना कोटक बँकेकडून ओबीसी प्रवर्गाद्वारे आरक्षण मिळावे अशी मागणी करण्यात आली कारण आर्थिक दृष्ट्या दुर्बल मराठी वर्गांना नोकरी तसेच शैक्षणिक क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर मदत होईल.
ज्यांच्याकडे कुणबी नोंदी सापडले आहे त्यांना लगेचच कुणबी प्रमाणपत्र दिले जाणार आहे सोबतच व्यक्तीच्या सर्व नातेवाईकांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचा मार्ग सुलभ झाला आहे.
जरी त्यांच्या नातेवाईकाकडे कुणबी नोंदी सापडल्या नसतील तरीपण त्यांच्या नात्यातील कोणाकडेही नोंदी सापडली तर सर्वांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय आता सरकारने घेतला आहे.
Kunbi Caste Certificate Documents
- वंशावळ (वडिल, आजोबा, पंजोबा)
- अर्जदाराचा रहिवासी दाखला
- जात स्वयंघोषणा प्रमाणपत्र
- शाळेचा दाखला (TC) किंवा बोनाफाईड
- अर्जदाराचे आधारकार्ड
- अर्जदराचे पासपोर्ट फोटो
- रेशनकार्ड
- जुना सातबारा उतारा
- निर्गम उतारा
- जन्म-मृत्यू नोंदीचा पुरावा (1967 पूर्वीचा)
- कुटुंबातील व्यक्तीचे जात प्रमाणपत्र (बंधनकारक नाही)
- कुणबी नोंद (1967 च्या पूर्वीची नोंद)
- जर तुम्हाला कुणबी नोंद सापडली नसेल, तर तुम्ही कुणबी नोंद ऐवजी; तुमच्या नात्यातील कोणाकडे जर नोंद असेल, तर त्यांचे कुणबी शपथपत्र ग्राह्य धरले जाणार आहे.
कुणबी नोंद कोठे शोधावी?
तुम्हाला जर असा प्रश्न पडला असेल की कुणबी नोंद कुठे शोधावी तर कुणबी नोंद तुम्हाला तुमच्या कुटुंबातील व्यक्तीच्या कोणाच्याही शाळेच्या टीसीवर निर्गम उताऱ्यावर तुम्हाला कुणबी नोंदी मिळतील सातबारा उतारा जुना सातबारा उतारा गाव नमुना नंबर 8 इत्यादी कागदपत्रावर तुम्हाला या नोंदी सापडतील
काही बाब लक्षात ठेवणे आवश्यक आहे.तुम्हाला लक्षात ठेवायची आहे, मिळालेली नोंद ही 1967 च्या पूर्वीच्या कागदपत्रांवर असावी. जर कागदपत्रे 1967 नंतरची असतील तर ती नोंद ग्राह्य धरली जात नाही.
Kunbi Caste Certificate Apply Online
- कुणबी दाखला काढण्यासाठी सुरुवातील अर्जदाराला तलाठी (तहसील) कार्यालयात कुणबी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी अर्ज सादर करावा लागतो.
- कुणबी प्रमाणपत्र काढण्यासाठी सर्वात अगोदर तलाठी कार्यालयामध्ये अर्ज सादर करावा लागेल
- एखादा पुरावा किंवा नोंद सापडली तर त्या पुराव्याच्या आधारे तुम्ही कुणबी प्रमाणपत्र कुणबी प्रमाणपत्र मिळवण्याकरता तहसील कार्यालयामध्ये अर्ज करू शकता
- अर्ज सादर करत असताना वरील सर्व कागदपत्र व्यवस्थित जोडावे.
- तहसील कार्यालयामध्ये अर्ज सादर झाल्यावर त्या अर्जाची पडताळणी केली जाते.
- ही पडताळणी प्रांत अधिकारी यांच्या मार्फत होत असते त्या अधिकाऱ्याची सही झाल्यानंतर अर्जदाराला कुणबी प्रमाणपत्र दिले जाते.
- कुणबी प्रमाणपत्र मिळाल्यानंतर अर्जदाराला ओबीसी आरक्षण प्राप्त होते.