Close Visit Mhshetkari

Kotak Bank Schollership : कोटक बँकेकडून शाळेची फी,वसतीगृह खर्च,इंटरनेट,लॅपटॉप,पुस्तके आणि स्टेशनरी साठी शिष्यवृत्ती ! लगेच येथे करा अर्ज

Kotak Bank Schollership : भारतातील ग्रामीण भागातील मुलांच्या उज्वल भविष्यासाठी शिक्षण हे अत्यंत महत्त्वाची गरज होऊन बसलेली आहे.आर्थिक अडचणीचा सामना करणाऱ्या मुलांसाठी कोटक बँकेने नवीन शिष्यवृत्ती योजना सुरू केलेली आहे.  

मुलांना शाळेच्या फी वस्तीग्रह खर्च इंटरनेट लॅपटॉप पुस्तके स्टेशनरी इत्यादीसाठी स्कॉलरशिप देण्यात येते. तर कोणकोणत्या शिष्यवृत्तीच्या आधारे आपण ही मदत मिळू शकता ?अर्ज कसा करायचा या संदर्भात सविस्तर माहिती आपण या लेखांमध्ये पाहणार आहोत .

कोटक बँक कन्या शिष्यवृत्ती योजना

मुलींचं उच्च शिक्षण वाढवण्यासाठी ‘कोटक कन्या छात्रवृत्ती’ सुरु करण्यात आली आहे.यातून ग्रामीण भागातून आलेल्या मुलींना इंजिनिअरिंग, मेडिकल, आर्किटेक्चर किंवा डिजाईनसारख्या व्यावसायिक पदवी शिक्षणासाठी दरवर्षी 1.5 लाख रुपयांपर्यंत आर्थिक मदत दिली जाते. सदरील स्कॉलरशिप शाळेच्या फी,वसतीगृह खर्च,इंटरनेट,लॅपटॉप, पुस्तके आणि स्टेशनरी या सर्व गोष्टींसाठी ही रक्कम वापरता येते.

कोटक ज्युनियर शिष्यवृत्ती

मुंबई मेट्रोपॉलिटन रीजनमधील 11 वी मध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी ‘कोटक ज्युनियर छात्रवृत्ती’ आहे. 10वीत 85% पेक्षा जास्त गुण मिळवलेल्या आणि वार्षिक कुटुंबाचे उत्पन्न 3,20,000 रुपयांपेक्षा कमी असणाऱ्या विद्यार्थ्यांना दरमहा 3,000 रुपये मिळतात. हे शिक्षणासाठी मदत करतच त्यांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठीही उपयुक्त ठरतात.

कोटक महिंद्रा बँक शिष्यवृत्ती 

तमिळनाडूमधील इंजिनिअरिंग, मेडिकल आणि एकात्मिक एलएलबी अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विशेष छात्रवृत्ती उपलब्ध आहे. 80% पेक्षा जास्त गुण आणि 5 लाख रुपयांपर्यंत वार्षिक कुटुंबाचे उत्पन्न या पात्रता असलेल्या विद्यार्थ्यांना दरवर्षी 2 लाख रुपयांपर्यंत मिळू शकतात.फी,वसतीगृह,अभ्यास सामग्री आणि लॅपटॉपवरील खर्चही यातून भरता येतात.

शिष्यवृत्तीसाठी अर्ज कसा करावा?

कोटक बँकेच्या अधिकृत वेबसाइटवर किंवा Buddy4Study यासारख्या वेबसाइट्सवरून शिष्यवृत्तीसाठी अर्ज करता येतो.

संबंधित शिष्यवृत्तीची माहिती वाचा आणि पात्रता निकष तपासा.
  • जर पात्र असाल तर, ऑनलाइन अर्ज भरा.
  • आवश्यक दस्तावेज जोडा, जसे की मार्कशीट, उत्पन्नाचे प्रमाणपत्र इ.
  • अर्ज प्रक्रिया पूर्ण करा आणि निवड प्रक्रियेची
  • प्रतीक्षा करा.

कोटक बँक शिष्यवृत्तीची अधिक माहिती येथे पहा

कोटक बँक शिष्यवृत्ती

This article Written by Swati Ghuge from Maharashtra.She is famous YouTuber, Website Developer and Administrator of liveupdate18.com

Leave a Comment