Investment Tips : नमस्कार मित्रांनो आपल्याला माहिती असेल की सध्या भारतीय गुंतवणुकीचे वेगवेगळे मार्ग अवलंबिल्या जात आहे यामध्ये सरकारी बँका बरोबर पोस्ट ऑफिस मधील गुंतवणूक सुद्धा सुरक्षित मानली जाते.तसंच यात मिळणारे फायदेही उत्तम असतात.
केंद्र सरकारने सध्या महिलांसाठी एक विशेष स्कीम सुरू केलेली असून याद्वारे महिलांना जबरदस्त फायदा मिळत आहे तर काय आहे योजना ? पाहूया सविस्तर.
महिला सन्मान प्रमाणपत्र योजना
जर महिलांना दोन वर्षाच्या कालावधीमध्ये श्रीमंत व्हायचे असेल तर पोस्ट ऑफिसच्या या योजनेत गुंतवणूक करता येते सरकार महिलांसाठी महिला सन्मान विकास पत्र योजना राबवत आहे.पोस्ट ऑफिसच्या या योजनेत महिला जास्तीत जास्त २ लाख रुपये गुंतवता येतात.
महिलांना अधिक व्याज देऊन बचत करून त्यांचे पैसे वाढविण्यात मदत करणं आहे. कोणत्याही वयोगटातील महिला यामध्ये गुंतवणूक करू शकतात.अल्पवयीन मुलीचे पालक त्यांच्या नावावर या योजनेत गुंतवणूक करू शकतात.
मित्रांनो महिला सन्मान विकास योजनेचा लाभ आपल्याला पोस्ट ऑफिस मध्ये घेता येतो सदरील योजनेत गुंतवणूक केल्याने महिलांना कोणत्याही प्रकारचे जोखीम पत्करावा लागत नाही आणि हमखास परतावा मिळतो साधारणपणे 2 लाख रुपये जमा करू शकतो.यासाठी गुंतवणुकीत 7.5% व्याजदर निश्चित करण्यात आला आहे.
सदरील सरकारी योजनांच्या माध्यमातून महिला बचत करून स्वावलंबी होऊ शकतील.विशेष म्हणजे सदरील योजना ही आयकर फ्री असून यात महिलांना कर सवलत मिळते दहा वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या मुलींचेही यासाठी खातं उघडता येते.
Post office Investment Tips
महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजनेत १ वर्ष पूर्ण केल्यानंतर आपल्याला आशिक स्वरूपात पैसे काढण्याची परवानगी मिळत असते अशा परिस्थितीत तुम्ही जमा केलेल्या रकमेपैकी 40% रक्कम काढता येते म्हणजेच दोन लाख रुपये जमा केले असतील तर आपल्याला 80 हजार रुपये काढता येतात.
महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजनेअंतर्गत, दोन वर्षांच्या कालावधीसाठी ७.५ टक्के दराने व्याज दिले जाईल.तुम्ही एकदा २ लाख रुपये गुंतवल्यास,तुम्हाला पहिल्या वर्षी १५,००० रुपये आणि दुसऱ्या वर्षी १६,१२५ रुपये परतावा मिळेल. थोडक्यात २ वर्षांत २ लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर योजनेअंतर्गत ३१,१२५ रुपये व्याज उत्पन्न मिळेल.