Close Visit Mhshetkari

Home loan Interest Rate : गृह कर्ज घेताना Fixed की Floating व्याजदर घेणे ठरू शकते योग्य ? कर्ज असेल तर घ्या समजून …

Home loan Interest Rate : नमस्कार मित्रांनो आपल्याला सर्वांनाच वाटते की आपलं स्वतःचं घर असावं परंतु घर पूर्ण करायचा असेल तर आपल्याला सर्वप्रथम विचार करावा लागतो,तो गृह कर्जाचा.गृह कर्जाच्या मदतीशिवाय आपण घर बांधू शकत नाही. 

अशा वेळेस गृह कर्ज घेताना प्रत्येकाला कमी व्याजदरात कर्ज मिळावं अशी अपेक्षा असते आता गृहखर्जा घेताना बँक आपल्याला दोन प्रकारच्या व्याजदरावंशी कल्पना देत नाही.गृहकर्जावरील व्याज हे फिक्स्ड किंवा फ्लोटिंग दरांवर दिले जाते.

Fixed vs Floating Home Loans

मित्रांनो सदरील दोन पर्याय पैकी ग्राहकाला एका पर्यायाची निवड करावी लागते तर आज आपण कोणता पर्याय आपल्यासाठी चांगला असेल याविषयी माहिती बघणार आहोत. गृहकर्जासाठी अर्ज करण्यापूर्वी कोणत्याही ग्राहकानं स्थिर व्याजदर आणि फ्लोटिंग व्याजदराचे फायदे आणि तोटे समजून घेतले पाहिजेत.

फिक्स्ड व्याजदराचे फायदे

  • फिक्स्ड व्याजदरातील कर्जामध्ये, कर्जाच्या कालावधीदरम्यान व्याजदर आणि EMI स्थिर राहत असतात.
  • दीर्घ कालावधीदरम्यान, किती रक्कम द्यायची हे आधीच माहित असते.
  • वाढत्या व्याजदराच्या परिस्थितीमध्ये फिक्स्ड रेट लोन घेणं फायद्याचं ठरू शकते.

फिक्स्ड व्याजदराचे तोटे

  • गृहकर्ज कर्ज देणाऱ्या बँकेशी संबंधित जोखमीमुळे, निश्चित दराच्या कर्जाची सरासरी किंमत 100 bps ते 200 bps जास्त असते. 
  • सदरील प्रकारात व्याज रक्कम आणि हप्ता वाढतो. व्याजदर कमी झाल्यास,फिक्स्ड रेटमध्ये तुम्हाला नुकसान सोसावे लागू शकते.
  • कर्जदारासाठी निश्चित दराच्या कर्जाचा आणखी एक तोटा म्हणजे ते केवळ एका विशिष्ट मर्यादेपर्यंतच निश्चित केले जातात.
हे पण पहा --  Bank Loans: तुम्ही बँकेकडून किती प्रकारचे लोन घेऊ शकता ? पहा संपूर्ण माहिती

फ्लोटिंग रेटचा फायदा – नुकसान

  • फ्लोटिंग रेट कर्जामध्ये Repo Rate, MCLR इ. अंतर्गत बेंचमार्कनुसार व्याज दर बदलत असतात.
  • फ्लोटिंग व्याजदरासह होमलोन,बहुतेक प्रकरणांमध्ये, बेस रेटशी जोडलेले असतात. 
  • साधारणपणे, दरांमध्ये किमान थ्रेशोल्ड बदल असेल तरच दरात बदल केले जातात.
  • फ्लोटिंग रेट कर्जावरील व्याजदर कमी आहेत. 
  • फ्लोटिंग रेट लोन फायनान्शिअल अॅडजस्टमेंटसाठी फारशी अनुकूल नसतात.
  • वाढत्या व्याजदराच्या परिस्थितीत,फ्लोटिंग रेट कर्जे अधिक महाग होऊ शकतात.
  • बँका कर्जदाराला हप्ता किंवा कार्यकाळ वाढवण्याचा पर्याय देतात.

थोडक्यात आपण जर बदलत्या काळानुसार व्याजदर कमी करण्याच्या आशेवर असाल तर आपण फ्लोटिंग रेट फायद्याचा ठरू शकतो.आपल्याला गृह कर्जाच्या व्याजदरात बदल झाल्यास परिणाम जाणवत नसेल तर आपण हा पर्याय निवडावा.

Leave a Comment