Close Visit Mhshetkari

Home loan : आनंदाची बातमी ; नव्या वर्षात ‘या’ बँकेने ग्राहकांना दिली मोठी भेट ! कर्ज केले स्वस्त ..

Home loan : नमस्कार मित्रांनो आपल्याला माहिती असेल की कोरोना काळानंतर सर्वच बँकांनी हळूहळू व्याजदरांमध्ये वाढ केलेली आहे.गेल्या वर्षी रिझर्व्ह बँकेने रेपो दरात वाढ केल्यामुळे बँकांनी कर्जाचे व्याजदर वाढवले होते.

थोडक्यात सांगायचं झालं तर आरबीआय ने रेपो दरात बदल केल्यानंतर बँका सुद्धा आपल्या सर्व कर्जाच्या व्याजदरात बदल करत असतात.

Home loan Interest Rate

नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच महाराष्ट्र बँकेने व्याजदरात सुधारणा केलेली आहे बँकेने गृह कर्जाचे व्याजदर कमी केले असून त्याचा फायदा गृह कर्ज धारक ग्राहकांना होणार आहे. म्हणजेच बँकेने ग्राहकांना नवीन वर्षाची भेट दिली आहे.

आज महाराष्ट्र बँकेने सांगितले की, त्यांनी गृहकर्जाचे दर १५ bpc ने ८.३५ टक्क्यांनी कमी केले आहेत. बँकेने आपल्या निवेदनात म्हटले आहे की गृह कर्जावरील व्याजदरातील कपाती बरोबरच प्रक्रिया शुल्क सुद्धा माफ करण्यात येणार आहे म्हणजे कमी व्याजदरासह प्रोसेसिंग फीज मधील सूट यामुळे ग्राहकांना दुहेरी फायदा होणार आहे.

हे पण पहा --  Personal Loan : पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचा पगार किती पाहिजे? पर्सनल लोन घेण्याअगोदर ह्या गोष्टी लक्षात घेणे आवश्यक आहे ?

New year Dhamaka offer 

महाराष्ट्र बँकेच्या या निर्णयामुळे सर्वच ग्राहकांना मोठी सुविधा मिळणार असून ग्राहकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

सदरील ऑफर देऊन बँक ग्रुप कर्जासाठी आणि उद्योगातील सर्वात कमी व्याजदरांपैकी एक ऑफर देऊ केल्याने सर्वत्र चर्चा सुरू आहे.

महाराष्ट्र बँकेने यापूर्वीच कार लोन आणि किरकोळ सोनेतारण कर्ज यावरील प्रक्रिया शुद्ध शुल्क सुद्धा माफ केल्याचे घोषणा केलेली होती. या योजनेला न्यू इयर धमाका ऑफर असे नाव देण्यात आले आहे.

This article Written by Swati Ghuge from Maharashtra.She is famous YouTuber, Website Developer and Administrator of liveupdate18.com

Leave a Comment