Close Visit Mhshetkari

Home Loan : झटपट होम लोन हवं आहे ? मग पटापटा ‘ही’ दोन कामे करा, कमी व्याज दरात मिळेल गृह कर्ज ..

Home Loan : नमस्कार मित्रांनो आपले परत एकदा स्वागत आहे मागील काही वर्षांपासून घराच्या किमती मध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आपल्याला दिसून येते. त्यामुळे सर्वसामान्यांना घर घेणे हे अवघड जात आहे.

आपल्या घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी गृह कर्ज हे घ्यावीच लागते व कर्ज घेण्यासाठी काय काय प्रोसिजर आहे हे आपण हे लिखामध्ये पाहणार आहोत त्यासाठी लेख शेवटपर्यंत बघा

Bank Home loan update 

गृह कर्ज घ्यायचे असेल तर ही माहिती तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची असणार आहे यासोबतच तुम्हाला काही गोष्टी माहिती असणे आवश्यक आहे ज्यावेळी आपण घर खरेदी करतो त्यावेळी आपल्याला डाऊन पेमेंट म्हणून काही पैसे भरावे लागतात आणि राहिलेले उर्वरित रक्कम विक्रेत्याला बँक देत असते.

कर्जदार आपल्या कर्जाची रक्कम आपट्याच्या स्वरूपात परत करू शकतो खरं सांगायचे झाल्यास होम लोन हे सर्वसामान्यांना परवडणारे व फायद्याचे राहते. यामुळे सर्व सामान्यांना छत देखील मिळू शकते. स्थावर मालमत्ता देखील तयार होते तुम्ही जेव्हा बँक मध्ये गृह कर्ज घ्यायला जातात त्यावेळेस तुम्हाला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते.

काही वेळेस बँके होम लोन मंजुरी देण्यासाठी अधिकच कालावधी घेत असते यामुळे अनेकांना प्रश्न पडतो की स्वस्त व्याजदरात कर्ज मिळवण्यासाठी काय केले पाहिजे.

त्यासाठी तुम्हाला एक महत्त्वाची बातमी सांगायची आहे. आपण जेव्हा कर्ज घेण्यासाठी बँक मध्ये जातो. तेव्हा आपल्याला लवकरात लवकर कर्ज मिळावे यासाठी काय केले पाहिजे.व्यक्ती कोणत्याही तयारी शिवाय गृहकर्जासाठी अर्ज करतात अशांचे कर्ज लवकर मंजूर होत नाही. गृहकर्ज देताना बँका तुमची चौकशी करतात. तुमचा क्रेडिट स्कोर कसा आहे तुमचे उत्पन्न किती आहे, असे प्रश्न विचारले जातात.

हे पण पहा --  Home Loan charges : गृहकर्जावर बँक तुमच्याकडून वसूल करते ‘हे’ छुपे चार्ज; महिती नसेल तर, जाणून घ्या सविस्तर…

Home loan tips 2024

क्रेडिट स्कोर : बँक तुम्हाला कर्ज देण्यापूर्वी तुमचा क्रेडिट स्कोर व तुमचे उत्पन्न यामध्ये जर काही अडचण असेल तर गृह कर्ज तुमचे नामंजूर देखील केले जाते यासाठीच तुम्हाला काही महत्त्वाच्या गोष्टी सांगायच्या आहेत ज्या तुम्ही लक्षात जर घेतल्या तर तुमचे ग्रुप अर्ज लवकरात लवकर मंजूर होऊ शकते.

होमलोन त्वरित मंजुरी करता तुमचा क्रेडिट स्कोर चांगला असणे व क्रेडिट स्कोर सुधारण्यासाठी वेळेवर उपाययोजना करणे आवश्यक असते तुमचा स्कोर सुधारण्यासाठी सर्व पेमेंट वेळेवर करणे आवश्यक आहे म्हणजेच तुम्ही जर कर्ज घेतले असेल तर ते वेळेवर व न चुकता फेडण्याचा तुम्ही प्रयत्न केला पाहिजे

एवढेच नव्हे तर तुमचा क्रेडिट रिपोर्ट वेळोवेळी तपासला पाहिजे आणि त्यात जर काही चुका आढळल्यास त्या तुम्ही दुरुस्त देखील केल्या पाहिजे. तुमचा जर क्रेडिट स्कोर चांगला असेल तर तुम्हाला कर्ज मिळण्यात मदत होईल.

योग्य बँक निवडा : होम लोन देण्यापूर्वी बँकांचे काही निकष आहे केवळ प्रक्रिया शुल्क आणि व्याजदर वेगळे नाहीत काही बँका मंजुरीसाठी कमी तर काही जास्त वेळ घेतात. काही बँका कर्जाच्या अर्जाची जास्त चौकशी देखील करतात. यामुळे योग्य बँक निवडणे तुम्हाला आवश्यक आहे.

म्हणूनच कर्जासाठी अर्ज करण्यापूर्वी तुम्ही अर्ज करत असलेल्या बँकेची माहिती जाणून घ्या. बँक कर्ज मंजुरीसाठी किती वेळ लावते ? तसेच कर्ज देण्याचे नियम कडक आहे का ही माहिती तपासून घ्या .

This article Written by Swati Ghuge from Maharashtra.She is famous YouTuber, Website Developer and Administrator of liveupdate18.com

Leave a Comment