Close Visit Mhshetkari

Health Insurance : शुभ्र शिधापत्रिका धारक कर्मचाऱ्यांना मिळणार आयुष्यमान भारत योजनेचा लाभ! शासन परिपत्रक निर्णय … 

Health Insurance : सार्वजनिक आरोग्य विभागाच्या दि.२६.०२.२०१९ च्या शासन निर्णयान्वये महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजना या योजनांची सांगड घालून, त्या राज्यात एकत्रितपणे राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Aayushman Bharat Card

सदर शासन निर्णयान्वये निर्धारित केलेल्या घटकांमध्ये दि.२८.०७.२०२३ च्या शासन निर्णयान्वये सुधारणा केल्या आहेत. त्यानुसार लाभार्थी घटकामध्ये शुभ्र शिधापत्रिकाधारक कुटुंबांचा देखील समावेश करण्यात आलेला आहे.

शुभ्र शिधापत्रिकाधारक कुटुंबांना महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेचा लाभ देण्याकरिता आयुष्यमान कार्ड निर्माण करण्यासाठी सदर शिधापत्रिका आधार क्रमांकाशी संलग्न करणे आवश्यक आहे.

Aadhar Seeded for Health Insurance

शुभ्र शिधापत्रिका आधार क्रमांकाशी संलग्न (Aadhar Seeded) करण्याची कार्यवाही करण्यात यावी, ही विनंती नियंत्रक शिधावाटप, मुंबई व सर्व उपायुक्त (पुरवठा) Ashish Vasant Atram कक्ष अधिकारी यांच्या कडून करण्यात आली आहे.

सदरील शासन निर्णयाचा महाराष्ट्र राज्यातील पांढरे शुभ्र रेशन कार्डधारक यामध्ये सरकारी कर्मचारी दारिद्र रेषे वरील कुटुंब यांना मोठा दिलासा मिळणार आहे. आपल्याला माहिती असेल की, आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत पाच लाख रुपये पर्यंतचा हेल्थ इन्शुरन्स एका व्यक्तीला देण्यात येतो.

हे पण पहा --  Health Insurance : तुम्हाला माहिती का कॅशलेस ट्रिटमेंट काय आहे, आणि तिच्या काय सुविधा याची सर्व माहिती जाणून घ्या

This article Written by Swati Ghuge from Maharashtra.She is famous YouTuber, Website Developer and Administrator of liveupdate18.com

Leave a Comment