Close Visit Mhshetkari

Girls Scholarship : मुलींच्या शिक्षणाकरिता सरकार कोणत्या स्कॉलरशिप देते? याविषयी सविस्तर माहिती पहा..

Girls Scholarship : सरकार जनतेसाठी विविध योजना राबवत असते तसेच भारत सरकारने मुलीच्या शिक्षणासाठी व त्यांच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी विविध शिष्यवृत्ती योजना राबवत असते. या शिष्यवृत्तीमुळे आर्थिक दृष्ट्या दुर्बल कुटुंबातील मुलींना शिक्षण मिळण्यास मदत होते. व त्यांना उच्च शिक्षण देखील शिष्यवृत्तीमुळे शक्य होत असते.

मुलींसाठीच्या काही प्रमुख शिष्यवृत्ती योजना

1 प्रगती शिष्यवृत्ती

तुम्हाला ही शिष्यवृत्ती मनुष्यबळ विकास मंत्रालय भारत सरकार द्वारे दिली आहे. या शिष्यवृत्तीचा लाभ घेण्यासाठी उमेदवाराचे वार्षिक उत्पन्न सहा लाखापेक्षा कमी असावे. व उमेदवाराला AICTE मान्यताप्राप्त महाविद्यालयामध्ये प्रवेश घेणे आवश्यक आहे. तुम्हाला या शिष्यवृत्ती अंतर्गत पदवी शिक्षणासाठी वर्षभरासाठी 30 हजार रुपये आणि 10 महिन्याकरता 2 हजार रुपये दिले जातात.

2 इंदिरा गांधी शिष्यवृत्ती

जाम कुटुंबामध्ये एकल पालक आहे. अशा कुटुंबातील मुलींना ही शिष्यवृत्ती मिळत असते. या शिष्यवृत्तीचा लाभ घेण्यासाठी उमेदवारांनी इयत्ता सहावी 60 टक्के गुण मिळालेले पाहिजे. या शिष्यवृत्ती अंतर्गत पात्र विद्यार्थ्याला दरमहा 500 रुपये दिले जाते.

3 स्वामी विवेकानंद शिष्यवृत्ती

तुम्हालाही शिष्यवृत्ती सोशल सायन्स मध्ये पीएचडी करत असलेल्या मुलींना प्रदान करण्यात येते. या शिष्यवृत्ती अंतर्गत पहिल्या दोन वर्षासाठी दर महिन्या 25000 रुपये फेलोशिप देण्यात येते.

हे पण पहा --  Reliance Scholarship : रिलायन्स स्कॉलरशिप साठी लगेच करा ऑनलाईन अर्ज ; पाच हजार विद्यार्थ्यांना मिळणार 2 लाख रुपये पहा सविस्तर माहिती!

4 वुमेन साइंटिस्ट स्कीम

ही शिष्यवृत्ती मुलींना टेक्निकल करिअर करण्यासाठी ही शिष्यवृत्ती देण्यात येते. यामध्ये दर महिन्याला  फिलोशिफ्ट दिली जाते. यामुळे मुलींना आपले शिक्षण पूर्ण करण्यास मदत होते.55000 पर्यंत देण्यात येणार येतात.

5 बेगम हजरत महल राष्ट्रीय शिष्यवृत्ती

 या शिष्यवृत्ती अंतर्गत महिलांना 6 हजार रुपयांचे आर्थिक मदत केली जाते.स्कॉलरशिप अल्पसंख्यांक महिलांना मौलाना आझाद शिष्यवृत्ती देण्यात येते. या शिष्यवृत्तीचा लाभ घेण्यासाठी दोन लाखापेक्षा कमी आवश्यक आहे. वर्गात 50 टक्के गुण मिळवणे आवश्यक आहे. अशा मुलींना शिष्यवृत्ती चा लाभ मिळतो.

याशिवाय, सरकार विविध राज्यांसाठी विविध शिष्यवृत्ती योजना देखील चालवते. या योजनांची माहिती संबंधित राज्य सरकारांच्या वेबसाइटवर उपलब्ध आहे.

मुलगी असाल आणि तुमची आर्थिक परिस्थिती चांगली नसेल, तर तुम्ही या शिष्यवृत्ती योजनांसाठी अर्ज करू शकता. या शिष्यवृत्तीमुळे तुम्हाला तुमचे शिक्षण पूर्ण करण्यात मदत होईल.

This article Written by Swati Ghuge from Maharashtra.She is famous YouTuber, Website Developer and Administrator of liveupdate18.com

Leave a Comment