Close Visit Mhshetkari

Fixed Deposits : या बँकांकडून ज्येष्ठ नागरिकांना अधिक व्याज, घ्या जाणून व्याजदर …

Fixed Deposits : नमस्कार मित्रांनो ज्येष्ठ नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे .देशामधील विविध बँका त्यांच्या ग्राहकांना मुदत ठेवणारे मोठ्या प्रमाणावर व्याज देत आहे. त्याच वेळी या बँका ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या निमित्त दरापेक्षा जास्त व्याज देणार आहे.

स्मॉल फायनान्स बँक SFBs त्यांच्या ज्येष्ठ नागरिक ग्राहकांना 9.50% पर्यंत व्याज देत आहे. आज आम्ही तुम्हाला अशा काही बँकांविषयी सांगणार आहे. ज्या तुम्हाला तुमच्या टीव्हीवर पाच लाखापर्यंतचे विमा संरक्षण तसेच तुम्हाला जास्त व्याजदर आणि विविध सुविधा देणार आहे. या बँकांविषयी आज आपण माहिती पाहणार आहोत. ज्येष्ठ नागरिकांसाठी कोणत्या बँक आहेत. त्या सर्वाधिक व्याज देणाऱ्या याविषयी आपण माहिती पाहणार आहोत.

 सर्वाधिक व्याज देणाऱ्या बँकांचे

1. उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक

उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक आपल्या ज्येष्ठ नागरिक ग्राहकांना 2 वर्षे ते 3 वर्षांच्या मुदत ठेवींवर 9.10% व्याज देते .

2. युनिटी स्मॉल फायनान्स बँक

युनिटी स्मॉल फायनान्स बँक आपल्या ज्येष्ठ नागरिक ग्राहकांना 1001 दिवसांच्या मुदत ठेवींवर 9.50% व्याज देत आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना मोठ्या प्रमाणावर फायदा होणार आहे

3. सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक

सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक आपल्या ज्येष्ठ नागरिक ग्राहकांना 2 वर्षांपेक्षा जास्त आणि 3 वर्षांपर्यंतच्या मुदत ठेवींवर 9.10% व्याज देत असते.

हे पण पहा --  Bank new updates : ' या ' बँक खात्यांमध्ये किमान शिल्लक रक्कम नसली तरी, पडणार नाही दंड; RBI ने जारी केले नविन नियम...

4. जन स्मॉल फायनान्स बँक

जन स्मॉल फायनान्स बँक आपल्या ज्येष्ठ नागरिक ग्राहकांना 2 वर्षांपेक्षा जास्त आणि 3 वर्षांपर्यंतच्या मुदत ठेवींवर 9.10% व्याज देत आहे.

5. इक्विटास स्मॉल फायनान्स बँक

इक्विटास स्मॉल फायनान्स बँक आपल्या ज्येष्ठ नागरिक ग्राहकांना 444 दिवसांच्या मुदत ठेवींवर 9% व्याज देत आहे.

6. फिनकेअर स्मॉल फायनान्स बँक

फिनकेअर स्मॉल फायनान्स बँक आपल्या ज्येष्ठ नागरिक ग्राहकांना ७५० दिवसांच्या एफडीवर ९.११% व्याज देत आहे.

7. ESAF स्मॉल फायनान्स बँक

ESAF स्मॉल फायनान्स बँक आपल्या ज्येष्ठ नागरिक ग्राहकांना 2 वर्षे ते 3 वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या FD वर 9% व्याज देत आहे.

ज्येष्ठ नागरिकांनी एफडी निवडताना खालील गोष्टींचा विचार करा

  • व्याजदर: व्याजदर हा एफडी निवडण्याचा सर्वात महत्वाचा घटक आहे.
  • मुदत: आपण किती काळासाठी गुंतवणूक करू इच्छिता यावर मुदत अवलंबून आहे.
  • सुरक्षा: बँकेची आर्थिक स्थिती आणि सुरक्षा रेटिंग तपासा.
  • कर लाभ: कर लाभांचा विचार करा.
  • विशेष योजना: ज्येष्ठ नागरिकांसाठी उपलब्ध असलेल्या विशेष योजनांचा लाभ घ्या.

This article Written by Swati Ghuge from Maharashtra.She is famous YouTuber, Website Developer and Administrator of liveupdate18.com

Leave a Comment