Close Visit Mhshetkari

Fake Aadhaar Card : तुमच्याकडेही असू शकते बनावट आधार कार्ड, क्यूआर कोड व नावाद्वारे असे ओळखा …

Fake Aadhaar Card : नमस्कार मित्रांनो आपल्याला माहिती असेल की आताच्या डिजिटल युगात आधार कार्डचा वापर आपण सर्रास करत आहोत. परंतु याचा गैरफायदा घेणारे देखील घोटाळेबाज लोक आता आपल्याला आढळून येत आहेत.

घोटाळेबाज फसवणूक करण्यासाठी बनावट आधार कार्ड बनवण्याचा प्रयत्न करतात. आता डुबलीकेट आधार कार्ड कसे ओळखायचे आणि त्याचा गैरवापर कसा थांबवायचा या संदर्भात सविस्तर माहिती आपण या लेखांमध्ये बघणार आहोत.

Duplicate Aadhaar Card

मित्रांनो आपल्याला माहिती असेल की आधार कार्डचा वापर अनेक ठिकाणी ओळखपत्र म्हणून केला जातो अशा परिस्थितीत आधार कार्डवर असलेला बारा अंकी क्रमांक सदरील व्यक्तीं ची ओळख म्हणून व्यक्त करत असतो.

आधार कार्ड जारी करणारी एजन्सी यूआयडीएआय (UIDAI) आधार कार्ड बनवण्यासाठी वापरकर्त्याचे बुबुळ स्कॅन, फिंगरप्रिंट आणि फोटो यासारखे तपशील घेते. याचा अर्थ आधार कार्डमध्ये व्यक्तीचा डेमोग्राफिक आणि बायोमेट्रिक डेटा सेव्ह करत असतो.

Fake Aadhar card identified

सध्या बहुतांश ठिकाणी घोटाळेबाज बसून करण्यासाठी बनावट आधार कार्ड चा वापर करत आहेत अनेक प्रकरणांमध्ये बनवून आधार कार्डच्या माध्यमातून फसवणूक झाल्याचे आढळून आलेले आहे अशा परिस्थितीत UIDAI  वापरकर्त्याला खरे आणि बनावट आधार कार्ड ओळखण्यासाठी सत्यापनाची सुविधा देखील प्रदान करत आहेत. याविषयी सविस्तर माहिती

हे पण पहा --  Aadhar Card rules : पासपोर्ट प्रमाणेच होणार तुमच्या आधार कार्ड चे व्हेरिफिकेशन, सरकार बदलणार आहे नियम !पहा सविस्तर माहिती..

क्यूआर कोडद्वारे आधार पडताळणी

  • Google Play Store वरून mAadhaar App डाउनलोड करा.
  • आता ॲप उघडा आणि स्क्रीनवरील क्यूआर कोड स्कॅनर वर क्लिक करा.
  • मोबाईल कॅमेऱ्यात प्रवेश द्या आणि आधार कार्ड, ई-आधार किंवा पीव्हीसी आधारवरील क्यूआर कोड स्कॅन करा.
  • आपलयाला आधार कार्डची संपूर्ण माहिती स्क्रीनवर दिसून येते.

नावाने आधार पडताळणी

  • UIDAI च्या https://uidai.gov.in या अधीकृत वेबसाइटला भेट द्या 
  • My Aadhaar वर क्लिक करा आणि आधार सत्यापन पर्याय निवडा.
  • आपला आधार क्रमांक किंवा नाव आणि जन्मतारीख टाका.
  • सुरक्षा कोड टाका आणि सत्यापित करा वर क्लिक करा.
  • आपला आधार क्रमांक आणि आधार कार्ड स्टेटस स्क्रीनवर दर्शविला जाईल.
Aadhar Card Online Download

UIDAI च्या वेबसाइटवरून आधार कार्ड डाउनलोड करताना, ते नेहमी https://uidai.gov.in/ या अधिकृत URL द्वारे डाउनलोड करा.

आपण आधार कार्ड डाउनलोड करताना, ते नेहमी PDF स्वरूपात डाउनलोड करा आणि ते पासवर्डद्वारे सुरक्षित ठेवा.

आपण आपला आधार क्रमांक कोणासोबतही शेअर करू नये.

अधिक माहितीसाठी

  • आधार UIDAI वेबसाइटला :- https://uidai.gov.in/
  • ॲप :- mAadhaar 
  • UIDAI च्या टोल-फ्री क्रमांकावर : 1947

This article Written by Swati Ghuge from Maharashtra.She is famous YouTuber, Website Developer and Administrator of liveupdate18.com

1 thought on “Fake Aadhaar Card : तुमच्याकडेही असू शकते बनावट आधार कार्ड, क्यूआर कोड व नावाद्वारे असे ओळखा …”

Leave a Comment