Close Visit Mhshetkari

Exchange traded fund : ‘ईटीएफ’ म्हणजे काय ? ETF चा पर्याय महिलांसाठी ठरतोय लाभदायी …

Exchange traded fund : नमस्कार मित्रांनो सध्याच्या आधुनिक युगामध्ये आपल्याला सगळं हाताच्या बोटावर हव असतं.स्मार्टवॉच म्युझिक प्लेअर फूड भाजी किराणा ऑनलाइन शॉपिंग या सगळ्या प्रकारामुळे माणसाचे जीवन आरामदायी झालेला आहे.

आता या लाटेवर स्वार होऊन शेअर बाजारामध्ये एक्स्चेंज ट्रेडेड फंड (ईटीएफ) उदयाला आले. शेअर आणि म्युच्युअल फंड या दोन्हींचे फायदे यात मिळत असल्यामुळे अल्पावधीत लोकप्रियदेखील झाले.

‘ईटीएफ’ म्हणजे काय ?

‘ईटीएफ’ हा म्युच्युअल फंडा सारखाच एक गुंतवणुकीचा पण प्रकार आहे एटीएम द्वारे शेअर बाजार निर्देशांक सेक्टर इंगळे सोने, चलन आधी मध्ये गुंतवणूक केली जाते. त्यामुळे एटीएम मध्ये गुंतवणूक म्हणजे एकाच वेळी वेगवेगळ्या क्षेत्रात केलेली गुंतवणूक होईल. सध्या बाजारात विविध प्रकारचे ईटीएफ प्रकार उपलब्ध आहेत. उदा. इंडेक्स (निर्देशांक) ईटीएफ, सेक्टर ईटीएफ, गोल्ड ईटीएफ, सिल्व्हर ईटीएफ, बाँड ईटीएफ, चलन ईटीएफ, आंतरराष्ट्रीय ईटीएफ आदी.

‘ईटीएफ’ची खरेदी-विक्री

एटीएफ ची शेअर बाजारात नोंदणी करावी लागते. त्यामुळे शेअर बाजारात कामकाजाच्या वेळेत शेअर  प्रमाणे ETF खरेदी विक्री करता येते. एटीएम मध्ये गुंतवणूक करण्यासाठी बंद खात्याबरोबरच डिमॅट अकाउंट किंवा ट्रेडिंग खाते आवश्यक आहे.खरेदी किंवा विक्री केलेल्या ईटीएफ युनिटची नोंद आपल्या डी-मॅट खात्यात होत असते.

‘गोल्ड ईटीएफ’चा पर्याय

मित्रांनो आपल्याला माहिती असेल की मागच्या शतकापासून किंवा दशकापासून सोन्याच्या किमतीमध्ये मोठी वाढ झालेली आहे त्यामुळे बऱ्याच लोकांचा सोने खरेदीवर भर आपल्याला दिसून येत आहे.शेअरच्या तुलनेत सोने कमी अस्थिर आहे. कर्जसापेक्ष तारण म्हणूनही त्याचा वापर केला जाऊ शकतो. भौतिक सोन्याच्या तुलनेत गुंतवणूक परताव्याद्वारे उत्पन्न देत असल्यामुळे ‘गोल्ड ईटीएफ’ हा एक चांगला गुंतवणूक आहे.

गोल्ड ईटीएफ’चे फायदे
  • ‘गोल्ड ईटीएफ’मध्ये गुंतवणूक केल्याने बनावट सोनेखरेदीची भीती नाहीशी होते. 
  • कोणतेही अधिकचे मूल्य किंवा मेकिंग चार्जेस नसल्यामुळे भौतिक सोन्याच्या तुलनेत ‘गोल्ड ईटीएफ’ची किंमत कमी आहे.
  • कमी पैशातही (प्रत्येक युनिट एक ग्रॅम सोन्याइतके असल्याने) गुंतवणूक करता येते.
  • एका दिवशी सुद्धा वेगवेगळ्या किमतीलाही ‘गोल्ड ईटीएफ’ खरेदी करता येतात.
  • ‘गोल्ड ईटीएफ’ विकले/रीडीम केले, तर त्यावेळी सोन्याचा भाव काहीही असो, आपल्याला पैसे त्यावेळच्या ‘नेट अॅसेट व्हॅल्यू’नुसार मिळतात.

This article Written by Swati Ghuge from Maharashtra.She is famous YouTuber, Website Developer and Administrator of liveupdate18.com

Leave a Comment