Employee Salary Hike : नमस्कार मित्रांनो, केंद्र सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांच्या दोन मध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतलेला आहे. परिणामी कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ होणार आहे, तर कोणत्या भत्त्यात वाढ होणार याविषयी पाहूया सविस्तर.
Employee Salary Hike update
केंद्र सरकारने जुलै महिन्यात कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात (DA) 3% वाढ केली होती. सध्या डीए 53 % इतका झाला.आता सरकारने दोन अजून भत्त्यात वाढ केली आहे. महागाई भत्ता 50% झाल्यावर सातव्या वेतन आयोगने इतर भत्त्यात वाढ सुचवली होती.
नर्सिंग भत्ता आणि ड्रेस भत्ता
सप्टेंबर महिन्यात नर्सिंग भत्ता आणि ड्रेस भत्त्यात ही वाढ करण्यात आली आहे. नर्सिंग भत्ता आणि ड्रेस भत्ता दोन्हींसाठी पात्रता निकषात सुधारणा करण्यात आली आहे. दिनांक 4 जुलै 2024 रोजी EPFO ने याविषयीचे एक परिपत्रक काढले होते. DA 50% झाल्यानंतर इतर भत्त्यांवर परिणाम होतो.
आरोग्य मंत्रालयाने 17 सप्टेंबर 2024 रोजी याविषयी माहिती दिली होती. त्यानुसार, नर्सिंग भत्ता त्यावेळी वाढले, ज्यावेळी महागाई भत्ता 50% अधिक होईल. दिनांक 17 सप्टेंबर 2024 नुसार ज्यावेळी महागाई भत्ता 50% झाल्यानंतर नर्सिंग भत्त्यात 25% वाढवण्यात आला आहे.
महागाई भत्त्यात 3 % वाढ
केंद्र सरकारने दिवाळीपूर्वी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात तीन टक्के ची वाढ केलेली तीन टक्के महागाई भत्ता वाढल्यानंतर कर्मचाऱ्यांना आता 53 टक्के दरांनी डी ए वाढ देण्यात येत आहे.देशातील 1.15 कोटी कर्मचारी आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना या निर्णयाचा फायदा झाला होता.
दरम्यानच्या काळात महाराष्ट्र विधानसभेची सार्वत्रिक निवडणूक आचारसंहिता लागल्याने लागल्याने कर्मचारी सदरील भत्ता वाढीच्या प्रतीक्षेत राहिले आता नवीन मंत्रिमंडळ स्थापनेनंतर लवकरच राज्य कर्मचाऱ्यांना सुद्धा 3 टक्के महागाई भत्ता वाढ मिळणार आहे. सोबतच सहा महिन्याचा फरक सुद्धा मिळण्याची खात्रीलायक माहिती सूत्रांनी कळवलेली आहे.