Electric vehicles :- नमस्कार मित्रांनो आपल्याला माहिती असेल की, सध्याच्या युगामध्ये इलेक्ट्रिक वाहनांचा ट्रेड वाढत आहे. बहुतांश नागरिक पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीचा विचार करून पर्यायी इलेक्ट्रिक वाहन खरेदीचा मार्ग पकडत आहे. पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून सुद्धा इलेक्ट्रिक वाहनांचा वापर फायदेशीर असल्याने सरकार देखील यासाठी प्रोत्साहन देत आहे.
Electric vehicles charging station
सध्या भारतात इलेक्ट्रिक वाहनांची नुकती सुरुवात झालेली आपल्याला दिसत आहे परंतु भविष्यात भारतात रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर इलेक्ट्रिकल्स वाहने धावताना दिसतील मात्र या इलेक्ट्रिक वाहनांच्या चार्जिंग साठी चार्जिंग स्टेशनची गरज सुद्धा भागवावी लागणार आहे.
आतापासूनच जर आपण इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशनचा व्यवसाय सुरू करायचं ठरवलं तर भविष्यात नक्कीच या व्यवसायाला चुकीचे दिवस येणार आहेत तर हा व्यवसाय सुरू कसा करायचा याविषयी सविस्तर माहिती आपण या लेखांमध्ये पाहणार आहोत.
इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशन म्हणजे नेमके काय?
ज्याप्रमाणे पेट्रोल आणि डिझेल वाहनांसाठी पेट्रोल पंप उभारण्यात येतो त्याचप्रमाणे इलेक्ट्रिक वाहनांच्या चार्जिंग साठी इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन उभारावे लागणार आहे.त्यामुळे इलेक्ट्रिक वाहन वापरणारे प्रवासी प्रवास करत असताना चार्ज उतरल्यानंतर किंवा चार्जिंग कमी असताना इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन मधून काही पैसे देऊन त्यांचे वाहन चार्ज करू शकणार आहेत.
भारतात वेगवेगळ्या कंपन्या इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन वर सुरुवात करत आहेत या कंपन्यांसोबत पार्टनरशिप करून इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन व्यवसाय सुरू करण्याची संधी आहे. तुमच्याकडे चांगल्या प्रकारे पैसा असेल तर तुम्ही स्वतःचे इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन सुरू करू शकता किंवा अशा कंपनीची फ्रेंचाइजी देखील घेऊ शकतात.
इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन ठिकाण
इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन जर उभारायचे असेल तर खालील पर्यायचा विचार करू शकता.
- रेल्वे स्टेशनच्या बाहेर,
- पेट्रोल पंपाजवळ
- शॉपिंग मॉल जवळ,
- बस स्टॅन्ड जवळ
- महामार्गाच्या बाजूला
इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन ओपनेंनिग प्रोसेस
आपल्याला जर चार्जिंग स्टेशन स्वतः उभारायचे असेल तर, आपण भारत सरकारच्या कृषी मंत्रालयाकडे अर्ज करू शकता.एखाद्या प्रसिद्ध कंपनीच्या माध्यमातून आपल्याला फ्रेंचाईजी मिळवायची असेल तर कंपनीसोबत डिलीट करून चार्जिंग स्टेशन व्यवसाय करू शकता.भारतात अनेक कंपन्या त्यांच्या फ्रॅंचाईजी देत आहेत.