Close Visit Mhshetkari

Education Loan : खुशखबर … शिक्षणासाठी स्वस्त कर्ज हव आहे ? ‘या’ बँका करतील मदत; पहा सविस्तर ….

Education Loan : नमस्कार मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की,आज कालच्या काळात उच्च शिक्षण घेणे खूप अवघड झाले आहे भारतात शिक्षण घेणे असो किंवा परदेशात शिक्षण घेणे असो शिक्षण ही खर्चिक बाब झाली आहे.

Education loan Top Bank list

भारतात किंवा परदेशात जरी काही ठिकाणी शिक्षण मोफत असले तरी देखील अनेक महत्त्वाच्या गोष्टी असतात,ज्यामध्ये राहणे,खाणे, प्रवास आणि पुस्तके यासारख्या अनेक बाबींसाठी आर्थिक गरज भासत असते.

आर्थिक परिस्थितीमुळे अनेक गुणवंत विद्यार्थ्यांना आपले शैक्षणिक ध्येय पूर्ण करता येत नाही किंवा प्रदेशात जाता येत नाही. ही बाब लक्षात घेऊन अनेक बँका विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक कर्ज उपलब्ध करून देत असतात याचा अभ्यास सुद्धा इतर कर्जा पेक्षा कमी असतो.

मित्रांनो, बँकांकडून अनेक अटी पूर्ण कराव्या लागतात आपण जर या अटी पूर्ण केल्या तर आपल्याला बँका सहज कर्ज उपलब्ध करून देतात आज आपण अशा पाच महत्त्वाच्या बँका विषयी माहिती बघणार आहोत ज्याद्वारे आपल्याला अतिशय कमी व्याज दारात शैक्षणिक कर्ज उपलब्ध होते.

Education loan Interest Rate

Unian Bank of India : युनियन बँक दरवर्षी 9.25 % दराने शैक्षणिक कर्ज देत आहे. आपण जर 50 लाख रुपयांचे शैक्षणिक कर्ज 7 वर्षांसाठी घेतले तर आपल्याला 81,081 रुपयांचा हप्ता भरावा लागेल.

हे पण पहा --  Business Loan : मोठी बातमी ... व्यवसायासाठी कर्ज हवे आहे? चर्मोद्योग विकास महामंडळाकडे लगेच करा अर्ज !

Bank of Baroda : बँक ऑफ बडोदा परदेशात शिक्षणासाठी 9.7 % दराने शैक्षणिक कर्ज देते आहे.आपण जर 7 वर्षांसाठी 50 लाख रुपयांचे शैक्षणिक कर्ज घेतल्यास आपल्याला 82,233 रुपयांचा EMI भरावा लागेल.

ICICI Bank : आयसीआयसीआय बँक दरवर्षी 10.25 % व्याजदराने शैक्षणिक कर्ज देते. जर आपण 7 वर्षांसाठी 50 लाख रुपये घेतले तर तुम्हाला 83,653 रुपये हप्ता असेल.

Canara Bank : कॅनरा बँक दरवर्षी 10.85 % व्याजदराने शैक्षणिक कर्ज देत आहे. आपण जर 50 लाख रुपयांचे शैक्षणिक कर्ज 7 वर्षांसाठी घेतले तर आपल्याला 85,218 रुपयांचा हप्ता भरावा लागेल.

भारतीय बँक : मित्रांनो सदरील बँक परदेशात शिक्षणासाठी वार्षिक 8.6% व्याजदराने शैक्षणिक कर्ज देते. आपण जर 50 लाख रुपयांचे शैक्षणिक कर्ज 7 वर्षांसाठी घेतले तर आपल्याला 79,435 रुपये हप्ता भरावा लागेल.

IDFC First Bank : IDFC फर्स्ट बँक बँक 9 % वार्षिक व्याजदराने शैक्षणिक कर्ज देते. आपण जर सदरील बँकेकडून 50 लाख रुपयांचे कर्ज 7 वर्षांसाठी घेतले तर आपल्याला EMI 89,606 रुपये बसेल.

टीप :- शैक्षणिक कर्ज घेण्यापूर्वी कृपया एकदा सदरील बँकेची संपर्क करून अद्यावत व्याजदरासंदर्भात खात्री करावी

Leave a Comment