Close Visit Mhshetkari

E PAN Card : नवीन पॅनकार्डसाठी अर्ज कसा करावा ? पहा Email ID वर Pan 2.0 ऑर्डर करण्याची पद्धत …

E PAN Card : पॅन 2.0 प्रकल्प लाँच झाला आहे. परंतु अद्याप सुरू झालेला नाही. पॅन 2.0 चा उद्देश आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून करदात्यांना सेवा आणि सुरक्षा प्रदान करणे आहे. पॅन 2.0 च्या नवीन सेवेअंतर्गत QR code असलेली E PAN Card अर्जदारांच्या नोंदणीकृत ईमेल आयडीवर मोफत पाठवली जातील. 

फिजिकल पॅन कार्ड हवे असेल, तर त्यासाठी 50  नाममात्र शुल्क भरावे लागणारआहे.आयकर विभागाने स्पष्ट केले आहे की, Qr code नसलेली जुनी पॅन कार्डे देखील पूर्णपणे वैध आहेत. 

पॅन 2.0 प्रकल्पांतर्गत पॅनचे वाटप,अद्यावत किंवा दुरुस्ती विनामूल्य केली जाईल. ई-पॅन नोंदणीकृत email id वर पाठविला जाईल.

How to order e PAN card

पॅन 2.0 अंतर्गत अर्ज कसा करावा ?

  • NSDL द्वारे ई-पॅनसाठी अर्ज कसा करावा लागणार आहे.
  • सर्व प्रथम NSDL पोर्टलवर जाऊन NSDL e-PAN पोर्टलवर क्लिक करावे https://www.onlineservices.nsdl.com/paam/requestAndDownloadEPAN.html या NSDL e-PAN पोर्टलवर क्लिक करावे.
  • तुमचा पॅन क्रमांक, आधार क्रमांक आणि जन्मतारीख टाका.
  • तुमची माहिती सत्यापित करा आणि वन-टाइम पासवर्डसाठी एक पद्धत निवडा.
  • तुमचा OTP एंटर करा आणि नंतर पेमेंट करा.
  • तीन वेळा ई-पॅन विनंत्यांसाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. यानंतर, प्रत्येक विनंतीवर 8.26 रुपये आकारले जातील.
  • पेमेंट केल्यानंतर, e-PAN तुमच्या ईमेलवर 30 मिनिटांच्या आत PDF स्वरूपात पाठवला जाईल.

UTIITSL द्वारे ई-पॅनसाठी असा अर्ज करावा ?

  • UTIITSL पोर्टलवर जा. ई-पॅन पोर्टलला भेट द्या https://www.pan.utiitsl.com/PAN_ONLINE/ePANCard
  • तुमचा पॅन क्रमांक, जन्मतारीख आणि कॅप्चा कोड टाका.
  • ईमेल नोंदणीकृत नसल्यास, तुम्हाला ते अद्यतनित करावे लागेल. जेव्हा पॅन 2.0 अधिकृतपणे लाँच केले जाईल.
  • पॅन जारी केल्यापासून 30 दिवस उलटून गेले असतील, तर ₹ 8.26 चे शुल्क भरून ई-पॅन पीडीएफ स्वरूपात ईमेलवर ऑर्डर केले जाऊ शकते.
  • तुमचे ई-पॅन तुमच्या नोंदणीकृत ई-मेल आयडीवर PDF स्वरूपात पाठवला जाईल.

Leave a Comment