Close Visit Mhshetkari

Digital Land record : खरेदीपूर्वी मूळ जमीन कोणाची? ब्रिटिशकालीन 1880 सालापासूनचे जमिनीची कागदपत्रे एका क्लिकवर…

Digital Land record : तुम्हाला कुठल्याही कारणास्तव जुने सातबारा आणि जुने फेरफार ही कागदपत्रे हवी असल्यास कशी प्राप्त करता ? आता 1880 सालापासूनचे जुने फेरफार उतारे सातबारा,खाते आपल्या मोबाईल वर ऑनलाईन कसे पहायचे याची संपूर्ण माहिती आपण घेणार आहोत.

Land British Documents

जर का काही कारणास्तव तुमचे जुने 7/12 आणि जुने फेरफार या पोर्टल वर उपलब्ध नसतील तर तुम्ही तुमच्या भूमि अभिलेख कार्यालयात जाऊन जमिनीच्या जुन्या कागद पत्रांसाठी अर्ज करून ऑफलाईन पद्धतीमध्ये जुने कागदपत्रे मिळायला खूप वेळ लागतो.कागदपत्रे शोधून द्यावी लागतात.

महाराष्ट्र शासनाने सर्व जुने 7/12 आणि फेरफार व इतर कागदपत्रे पाहण्यासाठी Aaple Abhilekh हे ऑनलाईन पोर्टल वर उपलब्ध करून दिले आहे.याठिकाणी तुम्ही जमिनीचे 1880 सालापासूनचे जुने फेरफार उतारे सातबारा,खाते आपल्या मोबाईल वर ऑनलाईन बघता येणार आहे.

राष्ट्रीय भूमी अभिलेख आधुनिकीकरण कार्यक्रमांतर्गत राज्यातील भूमी अभिलेखांची संगणकीकरण केले जात आहे. सध्या जुन्या अभिलेखांचे स्कॅनिंग करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.

राज्यातील मुंबई शहर वगळता उर्वरित ३५ जिल्ह्यांतील सर्व तहसील, भूमी अभिलेख आणि नगर भूमापन कार्यालयातील जुन्या अभिलेखांचे स्कॅनिंग करण्याचे कामकाज अंतिम टप्प्यात आहे.

हे पण पहा --  आपला सातबारा दोन मिनिटात मोबाईलवर डाऊनलोड करा,सही शिक्क्याची गरज नाही Digital land record

How to get old 7/12 Utara online

1. सर्वप्रथम, कोणत्याही वेब ब्राउझरमध्ये “Aaple Abhilekh” असे टाईप करून सर्च करा. Aaple Abhilekhe पोर्टल ओपन होईल.

2. Aaple Abhilekh या पोर्टलवर, तुम्हाला तुमची वैयक्तिक माहिती, घरचा पत्ता आणि लॉगिनची माहिती देऊन Registration करून Login करून घ्यावे.

3. एकदा तुम्ही लॉग इन केल्यावर, “फेरफार उतारा” निवडा.

4. तुमच्या गट क्रमांक टाकून “शोध” वर क्लिक करा.

5. शोध निकाल पेजवर, तुम्हाला तुमच्या गट क्रमांकाशी संबंधित फेरफाराची माहिती दिसेल.

6. फेरफाराचं वर्षं आणि क्रमांक तिथं दिलेला असतो. तुम्ही त्यावर क्लिक करून संबंधित वर्षाचा फेरफार पाहू शकता.

7. तुम्हाला ज्या वर्षाचा फेरफार पाहायचा आहे त्याच्या समोरील “कार्टमध्ये ठेवा” या पर्यायावर क्लिक करा.

8. “कार्टमध्ये ठेवा” वर क्लिक केल्यानंतर, तुमच्या स्क्रीनवर “Cart” चे पेज ओपन होईल.

9. “Cart” मध्ये, तुम्ही तुमच्या निवडलेल्या फेरफाराची माहिती पाहू शकता.

10. “Download Available Files” वर क्लिक करून तुम्ही तुमचा निवडलेला फेरफार डाउनलोड करू शकता.

‘आपले अभिलेख’ अधिकृत वेबसाईटवर भेट देण्यासाठी येथे क्लिक करा

➡️➡️ Land Records ⬅️⬅️

This article Written by Swati Ghuge from Maharashtra.She is famous YouTuber, Website Developer and Administrator of liveupdate18.com

Leave a Comment